Maharashtra Budget 2021: राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार; पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिलासा मिळणार?

Maharashtra Budget 2021: राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार; पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिलासा मिळणार?

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2021) दुपारी दोन वाजता सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पावर संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. या अर्थसंकल्पात नेमका कोणाला दिलासा मिळणार हे दुपारी कळेल. या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Budget 2021 Expectations in Marathi) कारण महाविकास आघाडी सरकार पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दहा दिवसांचं ठेवण्यात आलं आहे. अर्थसंकल्पाचा आजचा आठवा दिवस आहे. आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिलासा देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात सध्या पेट्रोल-डिझेल आणि सिलेंडरचे दर वाढले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात जनतेला पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये काही दिलासादायक बातमी मिळेल का, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट आणि सेस आकारला जातो. पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आणि १०.२० रुपये प्रति लिटर सेस आकारला जातो. तर डिझेलवर २१ टक्के व्हॅट आणि ३ रुपये प्रति लिटर सेस आकारला जातो. राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये दुष्काळ सेसचाही समावेश आहे.

५ मार्च २०२१ ला अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानच राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्यातून राज्याच्या सध्याची आर्थिक स्थिती ढासळल्याचं चित्र समोर आलं. कोरोनाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्व क्षेत्रांना मोठा फटका बसला असून एकटे कृषी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात घट असल्याची आर्थिक पाहणी अवलातून स्पष्ट झालं.

 

First Published on: March 8, 2021 10:37 AM
Exit mobile version