इंजिनीअरिंग, फार्मसी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

इंजिनीअरिंग, फार्मसी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

maharashtra cet cell announced revised admission schedule for engineering pharmacy and other courses

राज्यात कोरोनामुळे अनेक शैक्षणिक परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु प्रादुर्भाव कमी होत असल्याने शिक्षण विभागाकडून रद्द झालेल्या परिक्षांचे वेळापत्रक नव्याने जाहिर केले जात आहे. त्यातच राज्यात सामायिक प्रवेश कक्षाने (CET Cell) तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक सोमवारी जाहिर केले आहे. त्यामुळे सुधारित वेळापत्रकानुसार २१ जानेवारीपासून कॉलेज सुरू होणार आहेत. तर इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, एमसीए आणि एमटेक आदी अभ्यासक्रमांसाठी हे वेळापत्रक असणार आहे.

मराठा आरक्षणाला स्थगित केल्याने विद्यार्थ्यांना खुला गट किंवा आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून प्रवेश करण्याचे आदेश होते. मात्र विद्यार्थांना डॉक्युमेंटस जमा करताना अडचणी येत असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवण्यात आली. व आता पुन्हा सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत जाहीर झालेल्या जागेवरील प्रवेश निश्चित करण्यासाठी २० जानेवारी २०२१ दुपारी तीनपर्यंत लॉग इनमधून मान्य करु शकतील किंवा स्वीकारु शकतील. २० जानेवारी रोजीच सायंकाळी पाच वाजेपर्यंतच विद्यार्थ्यांनी कागदपत्रे व शुल्क भरुन प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर २१ जानेवारी रोजी दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील जाहीर होईल. २१ ते २३ जानेवारीदरम्यान विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदवता येईल. तर २५ जानेवारी दुसऱ्या फेरीचे प्रवेश जाहीर होतील. २६ ते ३० जानेवारी(दुपारी तीनपर्यंत) विद्यार्थ्यांना आपला लॉग इनमधून प्रवेश मान्य करु शकतात. तर २७ ते ३० जानेवारी (सायंकाळी पाचपर्यंत) विद्यार्थ्यांना संबंधित संस्थेत शुल्क भरुन व कागदपत्रे सादर करुन प्रवेश निश्चित करु शकतात. २१ जानेवारीपासून सर्व कॉलेज सुरु होतील. या प्रवेशप्रक्रियेसाठी पाच फेब्रुवारी ही अंतिम तारीख असणार आहे.

First Published on: January 19, 2021 1:42 PM
Exit mobile version