महाराष्ट्रावरचे संकट दूर करण्याची शक्ती दे; मुख्यमंत्र्यांची बाप्पाकडे प्रार्थना

महाराष्ट्रावरचे संकट दूर करण्याची शक्ती दे; मुख्यमंत्र्यांची बाप्पाकडे प्रार्थना

मुख्यमंत्र्यांची बाप्पाकडे प्रार्थना

महाराष्ट्रासह देशभरात गणपती बाप्पाच्या आगमनाची धूमधाम सुरू आहे. बाप्पा घरी येणार म्हटल्यावर सगळ्यांच्या अंगात एकप्रकारचा उस्ताह आणि चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. यात सर्वसामान्यांप्रमाणे राजकरण्यांमध्येही एक वेगळाच उत्साह संचारला आहे. अनेक राजकारणांनी आपल्या निवासस्थानी प्रतिष्ठापना केली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. मुंबईच्या ‘वर्षा’या शासकीय निवासस्थानी आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून बाप्पाचे मनोभावे पूजन केले आहे. यावेळी त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री

‘गणेश पर्व अत्यंत आनंदाचं पर्व आहे. देशात -विदेशात हा सण आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा होतो. पण महाराष्ट्रात बाप्पाचा उत्साह वेगळाच असतो. गणरायाला एवढीच प्रर्थना की सर्वांना राज्यातील आणि देशातील जनतेला आशीर्वाद द्यावा. महाराष्ट्रावरचे संकट दूर करण्याचा आणी पूर पिढीतांना दिलासा मिळावा यासाठी बाप्पाकडे प्रार्थना करतो, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी बाप्पाकडे केली आहे. तसेच त्यांचे आशीर्वाद कायमच माझ्या पाठीशी राहिले आहेत. त्यामुळे स्वतःसाठी काही मागण्याची वेळच आली नाही’.

ट्विटद्वारे दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा – बॉलिवूडकरांकडेही बाप्पाच्या आगमनाचा उत्साह!


First Published on: September 2, 2019 3:07 PM
Exit mobile version