वळवळ करणारे साप ठेचायचेच असतात – मुख्यमंत्री

वळवळ करणारे साप ठेचायचेच असतात – मुख्यमंत्री

राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवनेरी किल्ल्यावर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणात विरोधकांवर निशाणा साधला आहे. “साप तसे अजूनही आहेत. काही साप हे चावतात त्यामुळे त्यावर इलाज असतो. पण, असेही काही साप असतात जे वळवळ करतात त्यामुळे त्यांना योग्यवेळी ठेचायचे असते”, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केली आहे.

कोरोनाच्या लढाईत मास्क हिच ढाल

‘राज्यात अनेक राजे होऊन गेले. हे राजे लढाई करताना तलवारींचा वापर करायचे. पण, छत्रपती शिवाजी महाराज हे वेगळे ठरले कारण ते लढाई करताना केवळ तलवारीचा नाहीतर ढालेचाही वापर करायचे. त्यांनी आजपर्यंत अनेक लढाय्या जिंकल्या आहेत. त्यामुळे कोरोना हे ही एक युद्ध असून आपण देखील त्यांच्याप्रमाणे आता कोरोनावर मात करण्यासाठी मास्क या ढालेचा वापर करायचा आहे. कारण कोरोनावर मात करण्यासाठी मास्क हीच एक ढाल आहे’.

दादांच्या मानात काय चाललंय?

उद्धव ठाकरे भाषण करताना त्यांनी विचारले कि, ‘महाराजांना किती भाषा यायच्या यावर आमदार अतुल बेनके
म्हणाले की ‘महाराजांना इंगित विद्या भाषा येत होती. ते डोळ्यांनी संकेत देत. अजित दादांनाही इंगित विद्या शास्त्र येत’. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मग मी पण ही भाषा शिकणार आहे. कारण दादांच्या मानात काय चाललंय हे मला कळलं पाहिजे. जरी त्यांनी तोंडाला मास्क आणि डोळ्याला गॉगल लावला तरी त्यांच्या मनात काय चाले ते मला कळलेच पाहिजे’.


हेही वाचा – शिवनेरी गडाच्या विकास कामात उंनिसबिस चालणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार


 

First Published on: February 19, 2021 11:47 AM
Exit mobile version