Maharashtra Corona:कोरोना नियंत्रणात आणणाऱ्या ‘मुंबई पुणे मॉडेल’चे आरोग्य मंत्रालयाकडून कौतुक

Maharashtra Corona:कोरोना नियंत्रणात आणणाऱ्या ‘मुंबई पुणे मॉडेल’चे आरोग्य मंत्रालयाकडून कौतुक

कोरोनाच्या संभाव्‍य तिसऱया लाटेचा सामना करण्‍यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

राज्यात कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे तर काही जिल्हे कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यात मुंबईचे नाव प्रामुख्यांने घेतले जात आहे. मुंबईतील संख्या झपाट्याने कमी होत आहे. मुंबई पॅटर्नचे पंतप्रधानांनीही कौतुक केले. मुंबईनंतर पुण्यातही रुग्णसंख्याही झपाट्याने कमी झाली. कोरोनाच्या योग्य प्रतिबंधात्मक हाताळणीबद्दल मुंबई पुणे मॉडेलचे आरोग्य मंत्रालयाकडूनही कौतुक करण्यात आले आहे. मुंबई पुणे मॉडेल्सची अंमलबजावणी राष्ट्रीय व्हायला हवी. कोविड-19 संसर्ग नियंत्रणासाठी मुंबईने आमलात आणलेले विकेंद्रीकरणाचे मॉडेल देशपातळीवर राबवण्याची गरज असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाचे सह सचिन लव अग्रवाल यांनी म्हटले.

मुंबई महानगरपालिकेच्या योजनाबद्ध प्रयत्नांचे कौतुक

नागरिकांना संपर्क साधता यावा, त्यांच्या अडचणी सांगता याव्यात, यासठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते. मात्र ते महापालिका पातळीवर नाही, तर वॉर्ड पातळीवर तयार करण्यात आले होते. 24 वॉर्डासाठी प्रत्येकी एक असे 24 नियंत्रण कक्ष स्थापण्यात आले होते. मुंबई महापालिकेकडे जे रुग्णचाचणीचे रिझल्ट येतात त्यांना संबंधित वॉर्डातल्या नियंत्रण कक्षात पाठवले जात. हे कक्ष केंद्र म्हणून काम करत आणि त्यानुसार प्रत्येक वॉर्डात रुग्णसंख्या कमी करण्यावर भर देण्यात आला.

प्रत्येक वॉर्डरूम मध्ये 30 दूरध्वनी लाईन्स होत्या, त्या सांभाळण्यासाठी 10 फोन ऑपरेटर्स, 10 डॉक्टर्स आणि 10 रुग्णवाहिका होत्या. खाटांची उपलब्धता सांगणारे 10 डॅशबोर्ड देखील या कक्षांमध्ये लावण्यात आले. या सर्व प्रयत्नांमुळे रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी लोकांना काहीही त्रास झाला नाही.  याशिवाय, 800 SUV गाड्या तात्पुरत्या रुग्णवाहिका म्हणून रुपांतरीत करण्यात आल्या होता. या सर्व रुग्णवाहिकांचा माग काढत त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी एक सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार करण्यात आला. या सर्व व्यवस्था समन्वय राखून योग्यप्रकारे काम करत होत्या. जेणेकरुन रुग्णांना बेड मिळण्यात काहीही अडचण येऊ नये.

 

पुण्यानेही कोविड-19 च्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मिळवलेल्या यशाबद्दल, आरोग्य मंत्रालयाने पुण्यातील यंत्रणांचेही कौतुक केले. संसर्गाचे प्रमाण कसे नियंत्रणात आणता येईल, यासाठी या उपाययोजना आदर्श उदाहरण ठरल्या आहेत. मोठे समारंभ, लोकांची गर्दी यावर निर्बंध, अत्यावश्यक नसलेल्या कामांवर प्रतिबंध घालण्यासारखे कठोर उपाय साधारण 15 दिवसांसाठी केल्यानंतर रुग्णवाढीचा दर कमी होतो आणि रुग्णवाढीचा चढता आलेख सपाट व्हायला सुरुवात होते, असे आमचे निरीक्षण आहे.” असे आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.


हेही वाचा – लस खरेदीवर जागतिक पातळीवर पडताळणी करा, आदित्य ठाकरेंच्या महापालिकेला सूचना

First Published on: May 11, 2021 7:42 PM
Exit mobile version