धक्कादायक! पुण्याच्या झोपडपट्टीमध्ये आढळले कोरोनाचे दोन नवे रुग्ण

धक्कादायक! पुण्याच्या झोपडपट्टीमध्ये आढळले कोरोनाचे दोन नवे रुग्ण

आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयाचा ठेकेदार बदला सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत यांची मागणी

जगभरात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांमध्ये वाढ होताना दिसत असतानाच आज, ३० मार्च रोजी पुण्यामध्ये दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मार्केटयार्ड भागातल्या झोपडपट्टीमध्ये हे कोरोनाचे रुग्ण सापडले असल्यामुळे त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

३५ जणांची कोरोनातून मुक्तता

राज्यात करोनाचे २२ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून पाच रुग्ण पुण्याचे, तीन नागपूरचे, दोन अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. दरम्यान, करोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३ हजार ४५३ जणांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यांचे सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर  त्यापैकी २०३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३५ करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच सध्या राज्यात १७ हजार १५१ व्यक्ती होम क्वॉरंटमध्ये असून ९६० जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

जगभरात मृत्यूची संख्या

जगभरात कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या रविवारपर्यंत ३१ हजार ४१२ इतकी होती. हा आकडा २४ तासात वाढला असून सद्यस्थितीनुसार जगभरात ३३ हजार ९७६ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासाच ही संख्या २ हजार ५६४ ने वाढली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या

आतापर्यंत जगात ७ लाख २२ हजार १९६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही आकडेवारी पाहून अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या

जगभरात कोरोनाची लागण होऊन अनेक जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १ लाख ५१ हजार ७६६ लोक करोनामुक्त झाले आहे.


हेही वाचा – जगभरात कोरोनाची सद्यस्थिती : ७ लाख कोरोनाबाधित तर बळींची संख्या घाबरवणारी


 

First Published on: March 30, 2020 8:27 AM
Exit mobile version