Maharashtra Corona Update: रुग्णसंख्येत चढ-उतार सुरूच; १५ हजार २२९ नव्या बाधितांची नोंद

Maharashtra Corona Update: रुग्णसंख्येत चढ-उतार सुरूच; १५ हजार २२९ नव्या बाधितांची नोंद

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना पुन्हा फोफावतोय, २४ तासात १ हजार ४९४ कोरोनाबाधितांची नोंद

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात मंगळवारी १४ हजार १२३ आणि बुधवारी १५ हजार १६९ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. गुरुवारी हा आकडा आणखी काहीसा वाढला. गुरुवारी १५ हजार २२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७ लाख ९१ हजार ४१३ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ०४ हजार ९७४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५७,७४,६२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,९१,४१३ (१६.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५,६६,४९० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ७,०५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ३०७ कोरोनाबाधितांचा मृत्यू

तसेच कोरोनाबाधित मृतांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी २८५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तर गुरुवारी हा आकडा काहीसा वाढून ३०७ इतका झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६७ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत ९७ हजार ३९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

६१ हजारहून अधिक रुग्ण बरे 

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असतानाच समाधानकारक बाब म्हणजे राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात बरेही होत आहे. आज २५ हजार ६१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण ५४,८६,२०६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.७३ टक्के एवढे झाले आहे.

First Published on: June 3, 2021 8:41 PM
Exit mobile version