Maharashtra Corona Update : आज राज्यात 43 हजार 697 नवीन रुग्णांची नोंद ; मृत्यू दरात घट

Maharashtra Corona Update : आज राज्यात 43 हजार 697 नवीन रुग्णांची नोंद ; मृत्यू दरात घट

देशासह महाराष्ट्रातही कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यातच राज्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. काल मंगळवारच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ तर, मृत्यू दरात घट झालेला पाहायला मिळत आहे. आज राज्यात 43 हजार 697 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.तर आज 24 तासात 46 हजार 591 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.4% एवढे झाले आहे.राज्यात आज रोजी एकूण 2 लाख 64 हजार 708 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 49 कोरोना मृतांची नोंद झाल्याने मृत्यूदर 1.93 टक्क्यांवर पोहचला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 73 लाख 25 हजार 825 झाली आहे.राज्यात आजपर्यंत एकूण 69 लाख 15 हजार 407 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.राज्यात 23 लाख 93 हजार 704 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3,200 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये उपचार घेत आहेत. याशिवा राज्यात आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 25 लाख 31 हजार 814 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 73 लाख 25 हजार 825 (10.10 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज राज्यात 214 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी 100 रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने, 68 रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय आणि 46 रुग्ण राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र यांनी रिपोर्ट केले आहेत.आजपर्यंत राज्यात एकूण 2 हजार 74 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.


हेही वाचा – नगरपंचायत निवडणुकीत BJP अव्वल, राष्ट्रवादी दुसऱ्या तर शिवसेना चौथ्या स्थानी; पाहा पक्षनिहाय जागा


 

First Published on: January 19, 2022 10:21 PM
Exit mobile version