Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासात ५ हजार २१२ कोरोनाबाधितांची नोंद, १२३ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासात ५ हजार २१२ कोरोनाबाधितांची नोंद, १२३ रुग्णांचा मृत्यू

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ, मुंबईत २४ तासात ६७६ तर राज्यात १ हजार कोरोनाबाधितांची नोंद

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येतमध्ये कधी कमालीची घट पाहायला मिळते तर कधी रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रामध्ये एकूण ५ हजार २१२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये शनिवारच्या तुलनेत घट झालेली पाहायला मिळत आहे. शनिवारी राज्यात ६ हजार ७५३ कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर रविवारी गेल्या २४ तासात १२३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती फारशी आटोक्यात आली असली तरी सध्या ९४ हजार ९८५ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसतं आहे.

राज्यात ५ लाख व्यक्ती क्वारंटाईन

राज्यात सध्या एकूण ५ लाख १७ हजार ३६२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार ५०६ व्यक्ती हे संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५ हजार २१२ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ३५ हजार ०२९ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३३ टक्क्यांवर गेलं आहे. परंतू सध्या कोरोनावर उपचार घेण्याची संख्या लाखांच्या जवळपास असल्यान राज्याची चिंता मिटली नाही.

राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६८ लाख ४६ हजार ९८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ६४ हजार ९२२ (१३.३७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या कोल्हापूर, ठाणे, सांगली आणि मुंबई जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,६४,९२२ झाली आहे.

राज्यात अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव तीव्र असताा ऑगस्टच्या अखेरपासून महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचा चा इशारा दिला आहे. तज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेमध्ये राज्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यामुळे राज्य सरकारनं तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेमध्ये महत्त्वाच्या उपाययोजना करुन ठेवल्या आहेत. तसेच काही ठिकाणी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.

First Published on: July 25, 2021 8:00 PM
Exit mobile version