Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये चढ उतार सुरुच, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या घटली

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये चढ उतार सुरुच, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या घटली

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना पुन्हा फोफावतोय, २४ तासात १ हजार ४९४ कोरोनाबाधितांची नोंद

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मागील २४ तासात मंगळवारच्या तुलनेत १ हजार रुग्णांनी वाढ झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली अद्याप दिसत नाही आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत कधी घट तर कधी वाढ होतान दिसत आहे. कोरोनामुक्त नागरिकांच्या संख्येतही घट झालेला दिसत आहे. मागील २४ तासात राज्यात एकूण ६ हजार ६७ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या २४ तासात ८ हजार ६०२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध कायम ठेवण्याबाबत राज्यमंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्या ६१,८१,२४७ झाली आहे. राज्यात सध्या एकूण १,०६,७६४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात ५,८०,७७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,३०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४६,०९,२७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,८१,२४७ (१३.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.

राज्यात मागील २४ तासात ६,०६७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५९,४४,८०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.१७ % एवढे झाले आहे.

First Published on: July 14, 2021 9:30 PM
Exit mobile version