संचारबंदीच्या आदेशाचे तीन तेरा; नियम मोडणाऱ्या ६१६ जणांवर गुन्हा दाखल

संचारबंदीच्या आदेशाचे तीन तेरा; नियम मोडणाऱ्या ६१६ जणांवर गुन्हा दाखल

संचारबंदीच्या आदेशाचे तीन तेरा; नियम मोडणाऱ्या ६१६ जणांवर गुन्हा दाखल

राज्यातील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आज पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी संचारबंदीच्या आदेशाला नागरिकांनी केराची टोपली दाखवली आहे. सर्व आदेश पायदळी तुडवत नागरिक विनाकारण संचार करत आहेत. अशांवर कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ६१६ जणांवर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात आजपासून कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तथापि, औरंगाबादमध्ये मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आला होता. १२ मार्च २०२१ पासून करोना कायदे मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात हॉटेल चालक, दुकानदार, तसंच विविध ठिकाणी काम करणाऱ्यांवर या नियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षित अंतर न ठेवणं, मास्क न लावणं आणि जास्त लोक जमवून रोगाचा प्रसार होण्यास मदत करणे या अंतर्गत विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात १२ मार्च ते १० एप्रिल या दरम्यान १७ पोलीस ठाण्यांमध्ये ६१६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापुरात संचारबंदीचं उल्लंघन करणारे पोलिसांच्या ताब्यात

सोलापुरात संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोलापूर गुन्हे शाखेकडून ३० पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतलं आहे. शहरात अनेक चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शासनाने संचारबंदी जाहीर केल्यानंतरही अनेक नागरिकांची रस्त्यावर मोठी गर्दी दिसत आहे.

 

First Published on: April 15, 2021 1:59 PM
Exit mobile version