Pulwama Attack : राज्यातील शहीद जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत जाहीर

Pulwama Attack : राज्यातील शहीद जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आम्ही आता पेटलेलो आहोत, आणि काश्मीरमधील भ्याड हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. दरम्याना, दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्यातील जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येक ५० लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे तासगाव नगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा केली.

पाकिस्तान भिकारी झाला

या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. तसेच आम्ही पेटलेले आहोत. आमच्या सर्वांच्या मनात राग आहे. पाकिस्तान हा देश भिकारी झाला आहे. त्यांची जागा आम्ही दाखवून देणार आहोत आणि हा जुना भारत नाही. नवीन भारत आहे. त्यामुळे आम्ही उत्तर देणार असाल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. पुलवाम्याच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्यातील जवानांच्या कुटुंबाना सरकारकडून प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदतीची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली.

लवकरच इंदू मिलवर बाबासाहेबांचे स्मारक

इंदू मिल येथील बाबासाहेब यांच्या स्मारकाबाबत बोलताना बाबासाहेब यांच्या स्मारकासाठी मागच्या काळात जागा सुद्धा उपलब्ध झाली नाही. पण नरेंद्र मोदी यांनी जागा मिळवून दिली आणि लवकरच इंदू मिलवर बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्ही स्मारक उभं करत आहोत असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

First Published on: February 15, 2019 8:16 PM
Exit mobile version