राज्यात नवे मंत्रालय स्थापन करण्याच्या हालचाली सुरु; हे आहेत पर्याय

राज्यात नवे मंत्रालय स्थापन करण्याच्या हालचाली सुरु; हे आहेत पर्याय

महाराष्ट्र शासनातील २ लाख पदे रिक्त

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही नवीन मंत्रालय स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. महत्वाच्या कामांना चालना देण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील नाराजांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी नवीन मंत्रालया फायदेशीर ठरू शकतात. आपलं महानगरच्या हाती यातील काही मंत्रालयांची नावे लागलेली आहेत. कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यास खालीलप्रमाणे नवे मंत्रालये स्थापन करुन त्यावर मंत्री म्हणून नाराजांची वर्णी लागू शकते.

असे असतील नवीन मंत्रालय :-

३० डिसेंबर रोजी २६ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर १० आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली. त्यानंतर ५ जानेवारी रोजी खातेवाटप करण्यात आले. ३० डिसेंबर पासून महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील आमदारांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. मात्र तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे सर्वांनाच सामावून घेणे शक्य नसल्याचे सागंण्यात आले. तसेच २८ नोव्हेंबर रोजी सरकार स्थापन होऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी महाविकास आघाडीला एक महिना लागला होता. मंत्रालयांची संख्या वाढविण्याची चर्चा सुरु असल्यामुळे हा उशीर लागत असल्याचे सांगितले गेले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री यांनी ४ जानेवारी रोजीच सरकर खाती वाढविण्याचा विचार करत असल्याचे सांगितले होते.

 

 

First Published on: January 6, 2020 10:19 PM
Exit mobile version