गणेशोत्सव काळात कोकणवासीयांसाठी केलेली टोलमाफी फसवी?

गणेशोत्सव काळात कोकणवासीयांसाठी केलेली टोलमाफी फसवी?

टोलमाफी न केल्याने शिवसेनेचे आंदोलन

गणेशोत्सव काळामध्ये कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी खूशखबर दिली होती. गणेशोत्सव काळामध्ये गणेशभक्तांचा प्रवास टोल फ्री असणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र सरकारने केलेली टोलमाफी फसवी ठरली आहे. कारण कोकणातून कोल्हापूर मार्गे मुंबईला येणाऱ्या गणेशभक्तांकडून आणेवाडी, शिवापूर टोल नाक्यावर टोल वसुली करून लुट सुरू असल्याच उघड झाले आहे.

 

चाकरमान्यांना धरले वेठीस

कोकणातून मुंबईला येणाऱ्या गणेशभक्तांना फ्री टोल पास देण्यात आले होते. हे टोल फ्री पास असून देखील टोल वसूली केल्याची बाब उघड झाली आहे. १९ तारखेला कोकणातून कोल्हापूर मार्गे मुंबईला येत असता खेड शिवापूर टोल नाक्यावर टोल वसुली करून चाकरमान्याना वेठीस धरण्यात आले आहे. या टोल वसुली बदल कर्मचाऱ्यांकडे विचारले असता. त्यांनी असे उत्तर दिले की, शासनाने जो निर्णय घेतला आहे तो आनेवाडी आणी खेडशिवापूर या दोन टोल नाकयानां लागू होत नाही. कारण हे खाजगी टोल आहेत.

टोल वसुलीवर शिवसैनिकांचे आंदोलन

या टोल वसुलीनंतर भिवंडीतील पडघा टोल नाक्यावर शिवसैनिकांनी टोल बंद आंदोलन सुरू केले आहे. या आदोलनामुळे शेकडो शिवसैनिकांनी टोल वसुली बंद पाडली आहे. या आदोलनामुळे पोलीस प्रशासन आणि शिवसैनिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली आहे.

First Published on: September 21, 2018 2:36 PM
Exit mobile version