राज्यपाल कोश्यारींना हवीय निवृत्ती, राज्यपालपदासाठी नावही सुचवलं

राज्यपाल कोश्यारींना हवीय निवृत्ती, राज्यपालपदासाठी नावही सुचवलं

राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे आहेत. भरत गोगावलेंची प्रतोदपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने निरिक्षम नोंदवले आहे

अहमदनगर – मला निवृत्त व्हायचं आहे, पण मी राज्यपाल पदावर काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल पदावर सेवाभावी कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. अहमदनगरमधील स्नेहालय संस्थेच्या वतीने युवा प्रेरणा शिबिरात ते बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यपाल म्हणाले की, समाज सुधारवण्याचे काम युवकांना करावं लागणार आहे. मला निवृत्ती मिळायला हवी होती पण तरीही मी या राज्यपाल पदावर काम करतोय. खरंतर पंतप्रधान मोदींनी माझ्यापेक्षा स्नेहालय संस्थेच्या गिरीश कुलकर्णी यांच्यासारख्या व्यक्तीला राज्यपाल करायला हवं. त्यांनी समाजासाठी खूप मोठं काम केलंय.

देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी साजरा करत असताना देशाने प्रगती केली आहे. विशेष करून मागी सात-आठ वर्षांत देशाने भरपूर प्रगती केली. ज्या घरात वीज नव्हती तिथं वीज आली. शौचालय आले. ३३ कोटी लोकांचे बँकेत खातं सुरू करण्यात आले. असं असताना आपल्या शेजारील देशसुद्धा समृद्ध व्हावेत, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेची झोड

भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते. गुजराती आणि मारवाडी लोक महाराष्ट्रातून निघून गेले तर, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत होते. मुंबईबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी त्यासंदर्भात माफीदेखील मागितली. दरम्यान, माध्यमांशी न बोलण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्याचा खुलासा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला होता.

First Published on: August 13, 2022 7:02 PM
Exit mobile version