Covid variant : महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांचा यंत्रणेला अलर्ट! काय आहेत नवे आदेश ?

Covid variant : महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांचा यंत्रणेला अलर्ट! काय आहेत नवे आदेश ?

जगभरात काही देशांमध्ये डोक वर काढणारा कोरोनाचा नवा व्हेरीएंट पाहता राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने राज्यांसाठी नवीन मार्गदर्शके जाहीर केली आहेत. इस्राईल तसेच अनेक देशांमध्ये वाढणाऱ्या कोरोना रूग्णांची आकडेवारी पाहता सावधगिरीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून काही गोष्टी मार्गदर्शकांच्या रूपात जाहीर करण्यात आल्या आहेत. अनेक राज्यात कोरोनाशी संबंधित नियमावलीत सूट मिळालेली असतानाच काही बाबतीत मार्गदर्शके ही अंमलात आणावीच लागेल असे केंद्राचे मत आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, महापालिका आयुक्त तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना ही मार्ददर्शके अंमलात आणण्याचे आदेश आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी दिले आहेत.

देशात अनेक ठिकाणी कोरोनाची रूग्णसंख्या ही कमी होत आहे. पण त्याचवेळी जगभरात अनेक ठिकाणी ही संख्या वाढताना दिसत आहे. सुरूवातीला ही संख्या दक्षिण आशियाई देशात मर्यादित झाली होती. पण चीन आणि युरोपमध्ये कोरोना रूग्णसंख्येत वाढ झालेली आहे. जगभरात सध्या नव्या कोरोना रूग्णांची संख्या ही १ कोटी १० लाख इतकी असून यामध्ये ८ ते १० टक्के इतकी वाढ पहायला मिळत आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोना महामारीचा सुरूवात झाल्यापासूनची सर्वाधिक रूग्णसंख्या नोंदवली गेली आहे. दक्षिण कोरियात ६.२१ नव्या रूग्णांची संख्या वाढली आहे. तर जर्मनीत २.६२ लाख नवे कोरोना रूग्ण वाढले आहेत. युनायटेड किंग्डम येथे ९४ हजार नवीन कोरोना रूग्ण आढळले आहेत. तुलनेत आपल्याकडे दुसऱ्या कोरोना लाटेत ६८ हजार इतकी सर्वाधिक कोरोना रूग्णसंख्या नोंदवण्यात आली होती.

इस्राईल तसेच अनेक देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरीएंट आढळून आला आहे. त्यामुळेच या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना केंद्र सरकारने अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. राज्याचे

काय आहेत राज्य सरकारची नवीन मार्गदर्शके

– गर्दी करणे टाळा
– कोरोना प्रतिबंधासाठी योग्य त्या पद्धतीने मास्कचा वापर करा
– ILI आणि SARI संबंधित केसेसची चाचपणी करा, तसेच अलर्ट रहा
– कोरोनाविरोधीचे लसीकरण हे अधिकाधिक वाढवणे गरजेचे आहे
– सध्या कोरोनाचे २ हजार रूग्ण आढळत असले तरीही येत्या दिवसांमध्ये कोरोना रूग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे


 

First Published on: March 19, 2022 7:21 PM
Exit mobile version