महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : राज्यातील मंत्र्यांचा दौरा तूर्तास स्थगित

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : राज्यातील मंत्र्यांचा दौरा तूर्तास स्थगित

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे उद्या (मंगळवार) सीमा भागात जाऊन मराठी बांधवांची भेट घेणार होते. पण आता त्यांचा हा दौरा तूर्त रद्द करण्यात आला आहे. हा दौरा लांबवणीवर टाकण्यात आल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगला तापला आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांना पाणी सोडल्याने सरकारच्या गावकऱ्यांची समजूत काढणे महाराष्ट्र सरकाराठी कठीण झाल्याचे दिसत आहे. (Maharashtra Karnataka Border Dispute Minister Chandrakant Patil And Shambhuraj Desai Cancelled Belgaum Visit)

सीमावादाप्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांचा दौरा रद्द झाल्यानंतर या वाढत्या महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणारे आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे सीमावादावर अमित शहांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय, सीमावाद चिघळू नये यासाठी मंत्र्यांना तूर्तास दौऱ्यावर न जाण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी मंत्र्यांची समिती नेमली आहे. या समितीत चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचा समावेश आहेत. हे दोन्ही मंत्री उद्या बेळगावच्या दौऱ्यावर जाणार होते. याबाबत गेल्या आठवड्यात त्यांनी जाहीर केले होते. पण मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सीमा भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा दौरा रद्द करावा, असे आवाहन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना मंत्र्यांचा दौरा रद्द करण्याची मागणी केली होती.


हेही वाचा – ‘राज्यापालांच्या राजभवनात घुसून त्यांचा चहा न पिता…’ संजय राऊतांचे आशिष शेलारांना आव्हान

First Published on: December 5, 2022 11:50 AM
Exit mobile version