सीमावाद : ‘कर्नाटक त्यांच्या बाजूने बरोबर’; राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणेंचे वक्तव्य

सीमावाद : ‘कर्नाटक त्यांच्या बाजूने बरोबर’; राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणेंचे वक्तव्य

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादप्रकरण पुन्हा एकदा चिघळला आहे. या दोन राज्यांमधील सीमावाद हा सर्वोच्च न्यायालयात असतानाही कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठी भाषिक आणि वाहनांवरील सुरू असलेले हल्ले पुढील ४८ तासात थांबवा असा अल्टीमेटम कर्नाटक सरकारला होता. मात्र पक्षाध्यक्षांच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेणारे वक्तव्य केले आहे. (Maharashtra Karnataka Border Issue Ncp Mla Dattatray Bharne Karnataka Government)

“महाराष्ट्र कर्नाटक वादात कुठल्याही प्रकारचे राजकारण आणू नये. हा पूर्वीचाच वाद आहे. महाराष्ट्र त्यांच्या परीने बरोबर आहे आणि कर्नाटक त्यांच्या बाजूने बरोबर आहे. महाराष्ट्रातील काही गावांनी वेगळी भूमिका घेतली आहे. या गावांना पाणी, वीज, रस्ते यासारख्या मुलभूत सुविधा मिळत नाहीत. त्याबाबत सरकारने लक्ष द्यावे. या गावांना काही कर्नाटकमध्ये जायचे नाही. परंतु, त्यांनी त्यांच्या भावना कळवण्यासाठी हा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या या भावनेचा आदर झाला पाहिजे. बाकी या वादात कर्नाटक त्यांच्या जागी योग्य आहे आणि महाराष्ट्र त्यांच्या जागी बरोबर आहे”, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले.

बेळगाव येथे कन्नड रक्षक वेदिका या कानडी संघटनेकडून महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला सुनावले. “आमच्या संयमांचा अंत पाहू नका मराठी माणसाचा संयम सुटला तर जे काय होईल त्याला सर्वस्वी केंद्र आणि कर्नाटक सरकार जबाबदार राहील. मराठी भाषिक आणि वाहनांवरील सुरू असलेले हल्ले पुढील ४८ तासात थांबवा. अन्यथा मी स्वतः बेळगावत येऊन मराठी बांधवांसोबत उभे राहील”, असा इशारा शरद पवार यांनी दिला होता.

कन्नड रक्षक वेदिका संघटनेने महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला करत गाड्यांची तोडफोड केली. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने देखील कोगनोली टोल नाका येथे आंदोलन केले. यामुळे सध्या दोन्ही राज्यांमध्ये सुरू असलेली परिवहन सेवा ही गेल्या दोन दिवसापासून ठप्प आहे.


हेही वाचा – राज्यात बदल होणार, एक्झिट पोल्स चुकीचे ठरणार; जिग्नेश मेवाणी यांचा मोठा दावा

First Published on: December 8, 2022 9:15 AM
Exit mobile version