अर्जुनी गावातील ४ जणांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद

अर्जुनी गावातील ४ जणांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद

बिबट्या अखेर जेरबंद

चंद्रपूरमध्ये दहशत असलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यातील अर्जुनी परिसरामध्ये या बिबट्याने दहशत पसरवली होती. गेल्या १५ दिवसात या बिबट्याने १५ जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे अर्जुनी परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. हे नागरिक घराबाहेर पडण्यास देखील घाबरायचे. कारण हा बिबट्या नेमका कुठून हल्ला करेल याची शाश्वती नसल्याने घराबाहेर पडणे या नागरिकांना मुश्किल झाले होते.

चार जणांचा बळी घेणाऱ्या या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. १५ दिवसात या बिबट्याने ४ जणांचा बळी घेतला तर एकाला जखमी केले आहे. त्यामुळे अर्जुनीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्याचसोबत आपल्या नातेवाईकाचा बिबट्याने जीव घेतल्याने संताप देखील व्यक्त केला जात होता. वन विभागाने अखेर याची दखल घेत दोन दिवसापूर्वी अवनी परिसरामध्ये पिंजरा लावून ठेवला. या पिंजऱ्यामध्ये रात्री बिबट्या अडकला. बिबट्याला पकडलं खरं पण त्याला कुठे नेऊन सोडायचं यावर वनविभाग विचार करत आहे.

First Published on: December 15, 2018 1:16 PM
Exit mobile version