Maharashtra Lockdown 2021: ….तरच लॉकडाऊन उठू शकतो – अस्लम शेख

Maharashtra Lockdown 2021: ….तरच लॉकडाऊन उठू शकतो – अस्लम शेख

यंत्रमागधारकांची वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती; वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची माहिती

राज्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊन शिथिल करण्याबाबतचे संकेत काही मंत्री देत आहेत. आता मुंबईचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी ५० टक्के लसीकरण झाले तरच लॉकडाऊन उठू शकतो असे मोठे विधान केले आहे. अस्लम शेख म्हणाले की, लॉकडाऊन सरकरट उघडला जाणार नाही, पण सर्वसामान्यांना दिलासा मात्र देण्यात येईल. तसेच हॉटेल, सलून, व्यावसायिक, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊन उघडण्याबाबतचा निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नक्की काय म्हणाले अस्लम शेख?

‘जोपर्यंत राज्यासह मुंबईत लसीकरण ५० टक्क्यांच्या वर जात नाही तोपर्यंत लॉकडाऊन उठू शकत नाही. कारण हे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. लॉकडाऊन शिथिल करताना कोणती दुकाने उघडायची, कशी उघडायची? याबाबत विचार केला जाईल. तसेच एसी, कपडे, सलून, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांना आणि दुकानदारांना दिलासा मिळू शकतो. अत्यावश्यक सेवेतील दुकानांबाबतही सर्व विचार करण्यात येईल. याबाबत टास्क फोर्स विचारविनिमय करेल आणि त्यानंतर तशा हिशोबाने कॅबिनेटमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल,’ असे अस्लम शेख म्हणाले

दरम्यान मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३७ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ३७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर १ हजार ४२७ जण रुग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ९९ लाख ९०४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १४ हजार ७०८ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख ५५ हजार ४२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – Corona Vaccination: उत्तर प्रदेशमधील गावातील लोकांनी लस देणार म्हणून घेतल्या नदीत उड्या


 

First Published on: May 25, 2021 8:34 PM
Exit mobile version