अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी; नवे निर्बंध काय?

अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी; नवे निर्बंध काय?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला संबोधले. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत आहे. मात्र, कोरोना अजून नियंत्रणात आलेला नाही. ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. दुसऱ्या लाटेतील विषाणू झपाट्याने पसरतो आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के इतके आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी कमी होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. परंतु, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आलेला असला तरी काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची याआधी परवानगी होती. परंतु, पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या ठिकाणी ही वेळ आता वाढवण्यात आली असून अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.

ब्रेक द चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनपर्यंत हे निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे रोजी असलेली आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता लक्षात घेऊन हे निर्बंध असणार आहेत.

पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे आणि पालिकांसाठी शिथिल करण्यात आलेले निर्बंध –

पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी निर्बंध खालीलप्रमाणे वाढवण्यात येतील –

First Published on: May 30, 2021 10:41 PM
Exit mobile version