महाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढला, निर्बंध वाढवणे हा नाईलाज – मुख्यमंत्री

महाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढला, निर्बंध वाढवणे हा नाईलाज – मुख्यमंत्री

महाराष्ट्रात लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढला, निर्बंध वाढवणे हा नाईलाज - मुख्यमंत्री

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोनाची प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. हा लॉकडाऊन १ जूनपर्यं कऱण्यात आला होता. परंतु लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवून १५ जूनपर्यंत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईवद्वारे जनतेशी संवाद साधत होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्यासंबंधीची घोषणा केली आहे. तर राज्यातील लॉकडाऊन एकदम न उठवता टप्प्या-टप्प्याने उठवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. कोरोनाचा जिल्हानिहाय आढावा घेतला जाईल यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी किंवा जास्त असेल त्यापद्धतीने लॉकडाऊनमधील शिथिलतेबाबत ठरवण्यात येईल असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यात अद्याप कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली नसल्यामुळे राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात येत आहे. राज्यातील नागरिकांवर निर्बंध लादणे यासारखे कटू काम दुसरे असूच शकत नाही असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, दुसऱ्या लाटेवर आपण नियंत्रण आणत आहोत. राज्यातील निर्बंध हे पुढील १५ दिवस वाढवण्यात येत आहे. जिल्ह्यानुसार आढावा घेऊन काही जिल्ह्यातील निर्बंध शिथील तर काही जिल्ह्यातील कडक करण्यात येणार आहे. काही जणांकडून कुरबुर सुरु आहे की, हे उघडा ते उघडा अन्यथा कोरोना बिरोना आम्ही बघणारच नाही. त्यांना विनंती करतो की असे करु नका मला पुर्ण माहिती आहे की, संकट विचित्र आहे. कोरोनाचे संकट कमी झाले असल्यामुळे रस्त्यावर उतरु नका आणि जर उतरलाच तर कोरोना योद्धे म्हणून उतरा कोरोना दुत म्हणून उतरु नका असा सज्जड इशारा आणि आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

सणासुदीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येणाऱ्या सणासुदीच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. मागील वर्षी सण येण्यापुर्वी आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेला थोपावले होते परंतु आता सणासुदीच्या दिवसांमध्ये ही लाट आली आहे. कोरोना आढावा अहवाल बघितला तर जवळपास १७ ते १९ सप्टेंबर २०२० मध्ये राज्यात २४ हजारच्या वर रुग्ण सापडले होते तर आता चार दिवसांपुर्वी २४ हजार रुग्ण होते. यामुळे आपण राज्यातील कोरोना अजुनही कमी करु शकलो नाही आहे. फक्त संख्या कमी करण्यामध्ये यश आले आहे परंतु प्रादुर्भाव तेवढाच आहे.

यामध्ये दिलासादायक चित्र म्हणजे सक्रिया रुग्ण साडेतीन लाख होते मात्र आता ते कमी आहे. तर मागील वर्षी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्क्यांवर होते तर आता ९२ टक्क्यांवर आले आहे. मृत्यूदर २.६२ टक्के होता तो आता १.६२ टक्क्यांवर आला आहे. आता रुग्ण संख्या जरी कमी असली तरी गेल्यावर्षी ज्याप्रमाणात रुग्ण होते त्या प्रमाणात आता आलो आहे. मागील वर्षी कडक लॉकडाऊन ठेवण्यात आला होता परंतु आता कडक लॉकडाऊन ठेवण्यात आला नाही आहे. जशी राज्यातील रुग्णसंख्या कमी होत जाईल त्याप्रमाणे जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणि मोकळीकपणा मिळत जाईल. असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

आपलं गाव कोरोनामुक्त करा

राज्यात कोरोनाच्या लाटेला थोपवण्यासाठी आपण काही योजना राबवल्या होत्या यामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार अशा मोहिम राबवली यामुळे शहरातील संख्या आटोक्यात आली आहे. परंतु राज्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या हलक्या प्रमाणात वाढायला लागली आहे. यामुळे मी माझे गाव कोरोनामुक्त करेल घर कोरोनामुक्त करेल अस ठरवले पाहिजे. तर ‘कोरोनामुक्त गाव’ अशी नवी योजना मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे.

आपले गाव कोरोनामुक्त व्हावे यासाठी हिवरे बाजार सारखे गाव प्रयत्न करत आहेत राज्यातील सगळ्या गावांतील सरपंचांनी असा प्रयत्न केला आहे. यामध्ये तीन सरपंचांचे कौतुक करतो. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख आणि कोमलताई यांच्यासारखे यांच्यासारखे सरपंच एक उदाहरण घालून देत आहेत. त्यांच्याशी बोलणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. आज कोविडला रोखण्यात जसे वैद्यकीय उपचारांचे महत्व आहे तसेच लोकांची जागृती आणि सहभागही फार महत्वाचा आहे. सरकार एकट्यानेच हा लढा लढू शकत नाही. हिवरे बाजार सारखे शिस्तबद्ध रीतीने रोगाचा मुकाबला केल्यास आपल्यालाही कोविडशून्य गाव करता येऊ शकेलं आणि म्हणूनच हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील गावांनी नियोजन करावे असे आवाहन मी करतो. राज्य शासन या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

First Published on: May 30, 2021 9:37 PM
Exit mobile version