Election Results Maharashtra : औरंगाबादेत काँटे की टक्कर; चंद्रकांत खैरे पुन्हा आघाडीवर!

Election Results Maharashtra : औरंगाबादेत काँटे की टक्कर; चंद्रकांत खैरे पुन्हा आघाडीवर!

देवेंद्र फडणवीसांचा एमआयएमद्वारे महाविकास आघाडी तोडण्याचा डाव, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा आरोप

अमित शाह यांच्यासारख्या दिग्गजांच्या सभा होऊनही बारामती या पवारांच्या पारंपरिक मतदारसंघावर फारसा प्रभाव पडला नाही. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेतयाठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. राज्यातील हा पहिलाच घोषित निवडणूक निकाल आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाची पसंतीही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असून या ठिकाणी सुनील तटकरे विजयी झाले आहेत. विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री असलेले शिवसेनेचे अनंत गिते या ठिकाणी पराभूत झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागत आहेत. अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार हे मावळमधून पिछाडीवर आहे.  तर नांदेडमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पिछाडीवर आहेतऔरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पिछाडीवर आहेत, तर एमआयएमचे इम्तियाज जलील आघाडीवर आहेत. देशातील लोकशाहीचा उत्सव आता अंतिम टप्प्यात आला असून भारतातील ५४२ आणि राज्यातील ४८ जागांचे लोकप्रतिनिधी कोण असतील? याचा निकाल आता थोड्याच वेळात लागणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून पोस्टल मतदानाला सुरुवात होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होईल. सर्वच पक्षांसाठी ही अटीतटीची निवडणूक आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.  
Pravin Wadnere

औरंगाबादमध्ये सर्वाधिक चुरस! चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यामझ्ये काँटे की टक्कर! आधी पिछाडीवर असलेले खैरे आता ८०० मतांनी आघाडीवर!

Pravin Wadnere

उस्मानाबाद – शिवसेनेचे उमेदवार ओम राजे निंबाळकर 25 फेरी अखेर 121140 मतांनी आघाडीवर

ओमराजे निंबाळकर – 555874

राणा जगजितसिंह पाटील – 434734

Pravin Wadnere

राज्यातील प्रतिष्ठेची लढाई मानला जाणारा नांदेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून निसटला आहेत. भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकरांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार अशोक चव्हाणांचा तब्बल 33500 हजार मतांनी पराभव केला आहे.

Pravin Wadnere

चंद्रपूर : काँग्रेसचे धानोरकर 30558 मतांनी आघाडीवर!

काँग्रेस- बाळू धानोरकर : 331402

भाजप-हंसराज अहीर : 300544

वंचित राजेंद्र महाडोळे :- 68599

Pravin Wadnere

सोलापूरमध्ये जयसिद्धेश्वर स्वामी यांनी मोठा विजय मिळवला असून त्यामध्ये काँग्रेसचे दिग्गज उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना पराभव पत्करावा लागला आहे.

First Published on: May 23, 2019 2:12 PM
Exit mobile version