धीर सोडू नका, सरकराला मदतीसाठी भाग पाडू; उद्धव ठाकरेंचे शेतकऱ्यांना आश्वासन

धीर सोडू नका, सरकराला मदतीसाठी भाग पाडू; उद्धव ठाकरेंचे शेतकऱ्यांना आश्वासन

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. राज्यात मुसळधार पावसामुळे शेती पीकाचे नुकसान झाले आहे. तसेच, उद्धव ठाकरे या नुकसानग्रस्त भागांत पाहाणी करत आहेत. यावेळी त्यांनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. तर शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. त्यावर उद्धव ठाकरे यांनी “धीर सोडू नका, सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडू यात” असे आश्वासन दिले. (maharashtra monsoon imd Uddhav Thackeray cm eknath shinde)

राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी शिरल्याने पीकांची नासाडी झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीव उद्धव ठाकरेंनी नुकसानग्रस्त भागांची पाहाणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याच प्रयत्न केला. तसेच आम्ही सर्व तुमच्यासोबत असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात प्रथमच उद्धव ठाकरे दौरा करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

”महाविकास आघाडीच्या काळात दोन अडीच वर्ष कोरोनानी खालली. कृषी क्षेत्राने आपल्याला वाचवलं आहे. त्या क्षेत्रात लॉकडाऊन करता येऊ शकत नव्हतं. तेव्हा शेतकरी राबला नसता तर आपल्यालाही खायला मिळालं नसतं. बदलतं वातावरणात पावसाची सुरुवात चक्रीवादाळाने होते. मग संततधार, अतिवृष्टी होते. पुण्यातही अतोनात पाऊस पडला. रस्ते तुंबले, घरांत पाणी शिरले”, असे उद्धव ठाकरे यांनी पाहाणी दौऱ्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंमुळेच निवडून आलात; अब्दुल सत्तारांना चंद्रकांत खैरेंचे प्रत्युत्तर

First Published on: October 23, 2022 3:08 PM
Exit mobile version