खुशखबर! राज्यात लवकरच पोलीस हवालदार पदांची भरती

खुशखबर! राज्यात लवकरच पोलीस हवालदार पदांची भरती

खुशखबर! राज्यात लवकरच पोलीस हवालदार पदांची भरती

राज्यात लवकरच पोलीस हवालदार भरती होणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. देशाला बेरोजगारीचा सामना करावा लागला. त्यातच आता सरकारने राज्यात लवकरच पोलिस हवालदारांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे. एकूण १२ हजार पोलीस हवालदारांची भरती करण्यात येणार असून भरतीच्या पहिल्या टप्प्यात ५ हजार २९५ पोलीस पदांची भरती करण्यात येणार आहे. यासंबंधीचे माहिती लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

नागपूरमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते. नागपूरच्या गुन्हेगारीमध्येही मोठी घट झाल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. मुंबई पोलिसांच्या धर्तीवर नागपूरातही अश्र्वदल पोलीस युनिट सुरू केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेरे दिले जाणार आहेत, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले. कोरोना महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. तर एकीकडे नोकरीच्या संध्या कमी होत चालल्या आहेत. राज्य सरकराच्या या निर्णयामुळे नोकरी शोधणाऱ्या तरूण मंडळींना दिलासा मिळणार आहे.

गेल्यावर्षी नागपूरमध्ये ९० हत्या, १४७ चोऱ्या, ५६ सोनसाखळी चोरींची नोंद करण्यात आली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी नागपूरमध्ये चोरीच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे वाढत्या बलात्काराच्या घटनाही आता दिवसेंदिवस कमी होऊ लागल्या आहेत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.


हेही वाचा – ईडीची नोटीस शोधायला माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय – संजय राऊत

First Published on: December 28, 2020 2:38 PM
Exit mobile version