Maharashtra politics : भाजपासोबत जाण्यास सहमत नव्हतो अन् नाही, शरद पवारांचा पुनरुच्चार

Maharashtra politics : भाजपासोबत जाण्यास सहमत नव्हतो अन् नाही, शरद पवारांचा पुनरुच्चार

Sharad Pawar on BJP Politics

अहमदनगर : लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने शिळ्या कढीलाही ऊत आणला जात आहे. इंदापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल, शुक्रवारी, 2019मधील सकाळच्या शपथविधीसंदर्भात वक्तव्य केले. भाजपाबरोबर जाण्यास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सहमत होते, असा दावा त्यांनी केला. तथापि, आज, शनिवारी अहमदनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी हा दावा फेटाळला.

राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्यासमोर त्यांच्याच कुटुंबातील अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत. त्यामुळे पवार कुटुंबीयांनी याच मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मतदारांमध्ये उदासीनता का, हे तपासावे लागेल; मतदानाच्या टक्केवारीबाबत पवारांना चिंता

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपाबरोबर जाण्याचे ठरले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत एक नंबरच्या उद्यागपतीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली. त्याला मी देखील उपस्थित होतो. अशा पाच-सहा बैठका झाल्या आणि त्यात खातेवाटपाबद्दलही चर्चा झाली होती. पण ऐनवेळी शरद पवार यांनी निर्णय बदलला. पण अमित शहा यांनी फोन करून दिलेला शब्द पाळावा लागेल, असे सांगितले. त्यामुळे त्या दिवशी सकाळी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत शपथविधी झाला, अशी माहिती अजित पवार यांनी इंदापूरला दिली होती.

मात्र, शरद पवार यांनी आज, शनिवारी पत्रकारांशी बोलताना, हा दावा फेटाळून लावला. भाजपाबरोबर जाण्याची कधीच सहमती नव्हती आणि यापुढे देखील नसेल, असे शऱद पवार यांनी स्पष्ट केले.

सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. त्यावर शरद पवार म्हणाले की, या घोटाळ्याची मोदी यांनी चौकशी करावी. आमची काही हरकत नाही. उलट, ज्यांच्यावर आऱोप केले तेच त्यांच्याबरोबर फिरत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Reservation : चाणक्य आणि चॉकलेट हीरो आज कुठे आहेत? रोहित पवारांचा भाजपावर निशाणा


Edited by – Manoj S. Joshi

First Published on: April 20, 2024 12:26 PM
Exit mobile version