Live Update : मविआच्या महामोर्चाला मराठा क्रांती ठोक मोर्चाचा पाठिंबा

Live Update : मविआच्या महामोर्चाला मराठा क्रांती ठोक मोर्चाचा पाठिंबा

Live update Mumbai Maharashtra

महाविकास आघाडीतर्फे 17 डिसेंबरला काढण्यात येणाऱ्या महामोर्चाला मराठा क्रांती ठोक मोर्चाचा पाठिंबा

———————————————————————

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या उपस्थितीत बैठक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी केंद्रीय मंत्री अमित शाहांची चर्चा

दोन्ही राज्यांशी सकारात्मक चर्चा

———————————————————–

केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या उपस्थितीत महारष्ट्र कर्नाटक सीमावादावर दिल्लीत बैठक सुरू

सीमाप्रश्नावरील बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित

————————————————————–

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई देखील दिल्लीत पोहोचले

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सीमावादावर लवकरच बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सकारात्मक चर्चेची अपेक्षा

————————————————————————

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावरील मानहानीचा खटला बिनशर्त मागे

————————————

आमदार नियुक्ती प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार 7 फेब्रुवारीला

7 फेब्रुवारीपर्यंत राज्यपालांनी निर्णय घेऊ नये – सर्वोच्च न्यायालय

——————————————————————-

बोरीवलीतील गोराई येथे पोलिसांकडून बनावट कॉल सेंटर उद्धवस्त

पाच जणांना अटक, दोन कॉम्प्युटर आणि 13 हार्डडिस्क जप्त

—————————————————

अलिबागमध्ये राजन साळवी यांची एसीबीकडून साडेचार तास चौकीशी

——————————————————————-

डी कंपनी टेरर फंडिंग प्रकरणी सलीम फ्रुटवालाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना


भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा लक्ष्मीकांत देशमुखांचा राजीनामा


राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी तिघांना जामीन मंजूर


भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या २:३० वाजता पत्रकार परिषद घेणार


राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांचा टीएमसीत प्रवेश

माजिद मेमन राष्ट्रवादीचे माजी खासदार


कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या उपस्थितीत बैठक सुरू

मल्लिकार्जुन यांच्यासह ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी उपस्थित


स्वराज्य विस्तारासाठी संभाजीराजे नांदेड दौरा करणार


पवईतील महापालिका रुग्णालयाचा वाद चिघळला

क्लिनअपचा ताबा घेण्यासाठी महापालिका अधिकारी दाखल


समृद्धी महामार्गावर उद्यापासून एसटी बस धावणार

महामार्गावर धावणाऱ्या बसची तपासणी सुरू


शरद पवारांना धमकी देणाऱ्याला बिहारमधून अटक

आरोपीला आज मुंबईत आणले जाणार


भारताचा बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय


आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेत


आसामच्या गुवाहटीत पोलिसांनी जप्त केले १४ कोटींचे ड्रग्ज

‘हर हर महादेव’ चित्रपटाविरोधात आक्रमक

वादग्रस्त चित्रपट प्रदर्शित न करण्याची स्वराज्य संघटनेची मागणी


महापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात उद्या वरळी बंदची हाक


सोलापूर बंदमध्ये भाजप, शिंदे गट आणि मनसे सहभागी होणार नाही

राष्ट्रपुरुषांच्या अवमानाप्रकरणी 16 डिसेंबरला श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळातर्फे सोलापूर बंदची हाक देण्यात आली

सोलापूर बंदची हाक ही महाविकास आघाडीची आहे


धुळे- मुंबई आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ भीषण अपघात


अर्जेंटिनाने विश्वकरंडक फुटबॉलच्या अंतिम फेरीत धडक मारली

मेस्सीचे ड्रीबलिंग आणि अल्वारेझचे फिनिशिंग या चमत्काराच्या जोरावर आज अर्जेंटिनाने विश्वकरंडक फुटबॉलच्या अंतिम फेरीत धडक मारली

First Published on: December 14, 2022 11:08 AM
Exit mobile version