Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा हाहाकार! २७७ जणांचा मृत्यू  

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा हाहाकार! २७७ जणांचा मृत्यू  

Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात 1,134 कोरोनाबाधितांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढताना दिसत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी राज्यात ४९ हजार ४४७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तसेच मृतांचा आकडा शुक्रवारच्या तुलनेत खूप मोठा होता. शुक्रवारी २०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. तर शनिवारी २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०३,४३,१२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,५३,५२३ (१४.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कोरोनाच्या परिस्थितीबाबत वृत्तपत्रे आणि विविध माध्यम समूहांच्या संपादक, मालक, वितरक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. तसेच त्यांनी विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, राज्यातल्या व्यायामशाळांचे मालक-संचालक, नाट्य निर्माता संघाचे प्रतिनिधी, थिएटर मालक यांच्याशीही चर्चा केली. लॉकडाऊन करायचे की निर्बंध अधिक कडक करायचे यावर, तसेच संसर्ग रोखण्यासाठी इतर काही पर्याय आहेत का यावर या बैठकांमध्ये चर्चा झाली.

First Published on: April 3, 2021 8:46 PM
Exit mobile version