Maharashtra Corona Update: रुग्णसंख्येत पुन्हा वाढ! ५५,४६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Maharashtra Corona Update: रुग्णसंख्येत पुन्हा वाढ! ५५,४६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात 1,134 कोरोनाबाधितांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार होत असून सोमवारी ४७ हजारांपर्यंत घसरलेल्या रुग्णसंख्येने मंगळवारी पुन्हा उच्चांक गाठला. मंगळवारी राज्यामध्ये ५५ हजार ४६९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३१ लाख १३ हजार ३५४ झाली असून ४ लाख ७२ हजार २८३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबरोबरच मृतांच्या संख्येतही मंगळवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. राज्यामध्ये मागील २४ तासांमध्ये २९७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांची संख्या ५६ हजार ३३० वर पोहोचली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के इतका आहे.

३४ हजार २५६ रुग्ण बरे

मंगळवारी २९७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच ३४ हजार २५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २५ लाख ८३ हजार ३३१ रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९८ टक्के इतके आहे. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०९,१७,४८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३१,१३,३५४ (१४.८८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख ५५ हजार ४९८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर २२,७९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईमध्ये १० हजारहून अधिक नवे रुग्ण

मुंबईमध्येही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. मंगळवारी मुंबईमध्ये १० हजार ३० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. सध्या राज्यात ४ लाख ७२५ हजार ३३२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर मुंबईत ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

First Published on: April 6, 2021 10:20 PM
Exit mobile version