Corona In Maharashtra: राज्यात १३,९०६ रुग्णांना डिस्चार्ज; ३२५ बाधितांचा मृत्यू

Corona In Maharashtra: राज्यात १३,९०६ रुग्णांना डिस्चार्ज; ३२५ बाधितांचा मृत्यू

महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याचेच दिसत आहे. आज राज्यात दिवसभरात २३,८१६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, ३२५ रुग्णांचा आज मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा ९,६७,३४९ वर पोहोचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १३,९०६ रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ६,८६,४२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,५२,७३४ इतके अॅक्टिव्ह रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्या विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

२४ तासात देशात रूग्णांची संख्या ९० हजार!

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. देशात कोरोना रूग्णांचा आकडा ४३ लाख पार गेला आहे. गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी ७५ हजार कोरोना रूग्ण सापडल्यानंतर आज पुन्हा ८९ हजार ७०६ नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशात सध्या ४३ लाख ७० हजार १२९ कोरोनाबाधित रूग्ण आहेत.

दरम्यान, तर गेल्या २४ तासात १११५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृतांची संख्या ७३ हजार ८९० झाली आहे. त्यातल्या त्यात ३३ लाख ९८ हजार ८४५ रूग्ण निरोगी झाले आहेत. तर अजूनही ८ लाख ९७ हजार ३९४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.


वाईट बातमी: ऑक्सफर्डने थांबवली कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी!
First Published on: September 9, 2020 10:50 PM
Exit mobile version