Maharashtra Corona Update: कोरोनाचा वाढता धोका; ३७६ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: कोरोनाचा वाढता धोका; ३७६ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात 1,134 कोरोनाबाधितांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. बुधवारी राज्यात ३२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र, गुरुवारी हा आकडा वाढलेला दिसला. गुरुवारी राज्यात ३७६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.७७ टक्के इतका झाला आहे. तसेच गुरुवारी राज्यात ५६ हजार २८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. बुधवारच्या तुलनेत हा आकडा कमी झालेला दिसला. राज्यात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३२ लाख २९ हजार ५४७ झाली असून राज्यात ५ लाख २१ हजार ३१७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

३६ हजार १३० रुग्ण बरे   

तसेच गुरुवारी राज्यात ३६ हजार १३० रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २६ लाख ४९ हजार ७५७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८२.०५ टक्के इतके आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१३,८५,५५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३२,२९,५४७ (१५.१० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७ लाख ०२ हजार ६१३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २२ हजार ६६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत ८९३८ नवे रुग्ण 

मुंबईत बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कोरोनाबाधितांचा आकडा कमी झालेला दिसला. गुरुवारी मुंबईमध्ये ८९३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ४ लाख ९१ हजार ९८० इतकी झाली आहे. तसेच मागील २४ तासांत कोरोनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत एकूण ११ हजार ८८१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

First Published on: April 8, 2021 9:08 PM
Exit mobile version