Maharashtra Corona Update: राज्यात बाधितांचा आकडा वाढला; ८,५३५ नवे रूग्ण, १५६ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: राज्यात बाधितांचा आकडा वाढला; ८,५३५ नवे रूग्ण, १५६ जणांचा मृत्यू

Corona Update:

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आज वाढल्याचे समोर आले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार ५३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १५६ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६१ लाख ५७ हजार ७९९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २५ हजार ८७८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख १६ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज ६ हजार १३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख १२ हजार १७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०२ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४०,१०,५५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,५७,७९९ (१३.९९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,९६,२७९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,७७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज नोंद झालेल्या एकूण १५६ मृत्यूंपैकी ११८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १९४ ने वाढली आहे. हे १९४ मृत्यू, पुणे-१५४, सांगली-१८, ठाणे-६, रत्नागिरी-४, रायगड-३, अमरावती-२, पालघर-२, सोलापूर-२, जळगाव-१, कोल्हापूर-१ आणि सिंधुदूर्ग-१ असे आहेत.

First Published on: July 11, 2021 9:23 PM
Exit mobile version