सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द परंतु राज्यातील परीक्षा रद्द करणार नाही – वर्षा गायकवाड

सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द परंतु राज्यातील परीक्षा रद्द करणार नाही – वर्षा गायकवाड

Maharashtra SSC Exam 2021 CANCELLED: १० वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत द्या, विद्यार्थी संघटनांची मागणी

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यसह संपूर्ण देशात हाहाकार घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्येच आता शैक्षणिक वार्षिक वर्ष संपत आले आहे. काहीदिवसांपुर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्याची माहिती दिली होती. यानंतर आता केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे की, सीबीएसई बोर्डाने जरी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी CBSE बोर्डाच्या परीक्षासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि सीबीएसईचे सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जूनमध्ये बारावीच्या परीक्षा घेण्यात येण्याची शक्यता आहे. दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी त्यांना काही उपक्रमांमार्फत पास करण्यात येणार आहे. याबाबत विचार सुरु असल्याचेही सीबीएसई बोर्डाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केले आहे. तर दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मे महिन्याच्या शेवटी दहावीच्या तर जूनमध्ये पहिल्या आठवड्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. तसेच अन्य बोर्डाच्या परीक्षांबाबतही असाच निर्णय घेण्यासाठी सांगणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते. परंतु केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द परंतु बारावीच्या परीक्षा रद्द करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. यानंतर आता राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे लक्ष राज्यातील परीक्षांबाबतच्या निर्णयावर लागले आहे. वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षा घेणार असल्याचे वक्तव्य जरी केले असले तरी पुढे काय निर्णय घेण्यात येईल का याकडे सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

First Published on: April 14, 2021 3:54 PM
Exit mobile version