सर्वाधिक जीएसटी देणारा महाराष्ट्रच सर्वांत गरीब राज्य ठरले, 36 लाख कुटुंब दारिद्र्य रेषेखाली

सर्वाधिक जीएसटी देणारा महाराष्ट्रच सर्वांत गरीब राज्य ठरले, 36 लाख कुटुंब दारिद्र्य रेषेखाली

मुंबई – महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तब्बल १४.९ टक्के गरिबी असल्याचा दावा निती आयोगाने जाहीर केलेल्या गरिबी निर्देशांकात केला आहे. देशातील सर्वाधिक जीएसटी एकट्या महाराष्ट्रातून मिळतो. आणि त्याच महराष्ट्रात सर्वाधिक गरिबी असल्याचं भयावय चित्र समोर आलं आहे.

केरळ राज्याची गरिबी ०.७१ टक्के आहे. त्यानुसार, केरळच्या तुलनेत महाराष्ट्रात २१ पट गरिबी असल्याचंही समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. तसंच, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. त्यातच, अवकाळी पाऊस आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात गरिबी वाढली असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.

राज्यात ३६ लाख ११ हजार २५८ कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहेत. तर, या कुटुंबातील एकूण सदस्यांची लोकसंख्या एक कोटी ४४ लाख ४५ हजार ३२ इतकी आहे. यातील बहुते नागरिक मनरेगाअंतर्गत रोजगार करतात.

First Published on: November 16, 2022 10:49 AM
Exit mobile version