‘त्या’ बंगल्यांना रंगरंगोटी कशाला? सुनील प्रभूंच्या प्रश्नाला फडणवीसांचे उत्तर, सभागृहात हास्यकल्लोळ

‘त्या’ बंगल्यांना रंगरंगोटी कशाला? सुनील प्रभूंच्या प्रश्नाला फडणवीसांचे उत्तर, सभागृहात हास्यकल्लोळ

राज्य मंत्रिमंडळात एकही राज्यमंत्री नसताना नागपूर अधिवेशनात राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांची रंगरंगोटी, सजावट कशासाठी? असा हरकतीचा मुद्दा विधानसभा सदस्य सुनील प्रभू यांनी उपस्थित केला. ज्यानंतर विधानसभेत काही वेळ गोंधळ निर्माण झाला.

यावर लगेचच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रभू यांना उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, बांधकाम विभागाला हे माहिती नसते सरकार कधी मंत्रिमंडळ विस्तार करणार आहे. अधिवेशन काळातही विस्तार होऊ शकते ना, तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. यावेळी विरोधी बाकावरील आमदारांनी काहीतरी सवाल उपस्थित केला, ज्यावर फडणवीसांनी थेट त्यांनी तुम्हाला राज्यमंत्री मंडळात संधी हवी का? असा सवाल केला. ज्यावर सभागृहात एकचं हास्यकल्लोळ पाहायला मिळाला. विरोधांसह सत्ताधारी पाकावर बसलेले मंत्रीही हसू लागले.

बेळगाववर ठराव मांडावा, भुजबळांची सुचना 

मुख्यमंत्र्यांनी बेळगावसंदर्भात ठराव मांडावा व सभागृहाने तो एकमताने पारित करावा, अशी सुचना छगन भुजबळ यांनी हरकतीच्या मुद्द्यातून केली आहे.

यानंतर काँग्रेस अशोक चव्हाण यांनी रामटेक येथील कालिदास संस्कृत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आहे. मात्र, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास राज्यपालांनी नकार दिल्याची खंत व्यक्त केली आहे. यावर अध्यक्षांनी राज्यपालांच्या कृतीवरती सभागृहात चर्चा करता येत नाही, असा नियमाचा दाखला दिला.

यावर सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत राज्यपालांच्या हेतूबद्दल संविधानात शंका व्यक्त घेता येत नाही. अमृतमहोत्सवी वर्षात चुकीचे काही सांगू नये असे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.


तोट्यातील सहकारी कारखाने आता राज्य सरकार करणार खरेदी, उपमुख्यमंत्र्याची विधानसभेत माहिती

First Published on: December 19, 2022 1:33 PM
Exit mobile version