Lok Sabha : मविआच्या अडचणी वाढल्या; साताऱ्याच्या उमेदवाराला घोटाळ्याप्रकरणी अटक होणार?

Lok Sabha : मविआच्या अडचणी वाढल्या; साताऱ्याच्या उमेदवाराला घोटाळ्याप्रकरणी अटक होणार?

मुंबई : कोरेगाव भीमामधील आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये घोटाळा प्रकरणी आरोप केले आहेत. एपीएमसीमध्ये एफएसआय घोटाळा करून प्रशासनाचे 65 कोटींचे नुकसान केल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे. महायुतीचे उमेदवार उदयनराजे यांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे. या प्रकरणी आता नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात शशिकांत शिंदे यांच्याविरोधात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. शशिकांत शिंदे यांना अटक झाली तर लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. (Mahavikas Aghadis Satara candidate Shashikant Shinde scam case arrested any moment)

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये बाजार समितीच्या विकास टप्पा क्रमांक दोन मार्केट क्रमांक एक या मसाला मार्केटमध्ये बाजार समितीच्या आवारातील एफएसआय वाटप प्रक्रियेत भूखंड वाटप घोटाळा समोर आला आहे. हे प्रकरण 2009 चे आहे. 2009 मध्ये मसाला मार्केटच्या 466 गाळेधारकांना अधिकचे बांधकाम करण्यासाठी 600 रुपये चौरस फुटाने परवानगी देण्यात आली होती. यावेळी रेडीरेकनरचा 3066 रुपये दर होता. यामुळे एपीएमसी प्रशासनाची 65 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गाळे वाटप करून सरकारी महसूल बुडवल्याप्रकरणी एफएमटीसी मार्केटचे माजी संचालक आमदार शशिकांत शिंदे, माजी संचालक अशोक वाळुंज, माजी संचालक संजय पानसरे आणि बाळासाहेब सोळसकर यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष लेखापरीक्षक वर्ग क्रमांक दोनचे अधिकारी प्रकाश तानाजी मांढरे यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एपीएमसीचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.

हेही वाचा – Lok Sabha : मविआच्या अडचणी वाढल्या; साताऱ्याच्या उमेदवाराला घोटाळ्याप्रकरणी अटक होणार?

दरम्यान, कारवाईविरोधात शशिकांत शिंदे म्हणाले की, काल रात्री मला एक नोटीस आली. या नोटिशीतून कळलं की माझ्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीत अशा गोष्टी होत असतात, पण शरद पवारांची शप्पथ घेऊन सांगतो. अजून एक केस करा, दोन केस करा, अशा कितीही केसेस माझ्या अंगावर टाका, पण मरेपर्यंत मी शरद पवार यांची साथ सोडणार नाही. उद्या जे काय व्हायचं ते होऊ देत, पण निवडणूक अशी लढा की सर्वजण लक्षात ठेवतील, असे आवाहन शशिकांत शिंदे यांनी केले.

Edited By – Rohit Patil

First Published on: April 27, 2024 7:34 PM
Exit mobile version