Lockdown : महेंद्र सिंह धोनी गार्डनमधील गवत कापतोय; साक्षीने सोशल मीडियावर शेअर केला फोटो!

Lockdown : महेंद्र सिंह धोनी गार्डनमधील गवत कापतोय; साक्षीने सोशल मीडियावर शेअर केला फोटो!

देशात कोरोना व्हायरसचे सावट पसरले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घरामध्येच राहावे, असे आवाहन केले जात आहे. तसेच २९ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सध्या देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. हा १४ एप्रिल रोजी संपणार आहे. परंतु, कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयपीएल यावर्षी सुरू होईल, असे काही दिसून येत नाही. आयसीसी टी-२० वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते. आयपीएलला स्थगिती मिळाल्यामुळे क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीची क्रिकेट मैदानावरची एन्ट्री थांबली आहे. अशावेळी महेंद्र सिंह धोनी आपल्या घराबाहेरील गवत कापतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Picture of the day♥️ Duniya♥️ #Mywinnerdhoni ?? I Stand With mahi♥️? Forever #IStanTheBest Proud MSDIANS????? ♥Follow @dhoni_msd07 I_MSD07 ♥ ~@mahi7781 #mahendrasinghdhoni #dhonikeeptheglove #sakshidhoni#dhoni7 #dhonism #thaladhoni #dhonifan #dhoni#zivadhoni #msdhoni7781 #msdhoni @mahi7781 #msdhoni7781 #msdhoni #dhoni #dhonilove #csklove#cskreturns #msdhoni #msdian #msdstrong #msdhoni❤ #virat #viratkohli #mahirat #indiancricket#indiancricketteam

A post shared by mahi❤️ (@dhoni_forever77) on

देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे क्रिकेटर आपल्या परिवारांसोबत वेळ घालवत आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत जोडले गेले आहेत. महेंद्र सिंह धोनी हा सोशल मीडियावर कमी ऍक्टिव्ह असतो. मात्र, त्याची पत्नी साक्षी धोनी ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. साक्षी आपले घर, धोनी आणि मुलगी जीवाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तेव्हा आता लॉकडाउनच्या काळात साक्षीने धोनीचा एक फोटो शेअर केला असून लॉकडाऊनमध्ये धोनी काय करत आहे, हे तिने सांगितले आहे.

साक्षी धोनीने आपल्या इंस्टा स्टोरीवर महेंद्र सिंह धोनीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये धोनी गार्डनमधील वाढलेले गवत कापत असल्याचे दिसत आहे. धोनी या फोटोत रांची येथील फार्म हाऊसच्या बाईक गॅरेज समोर गवत कापताना दिसत आहे. धोनी गवत कापण्याच्या मशीनद्वारे गवत कापत आहे. साक्षीच्या या इंस्टास्टोरीचे फोटो चाहते फोटो शेअर करत आहेत.

First Published on: April 10, 2020 2:25 PM
Exit mobile version