पत्नीच्या हत्येनंतर पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न

पत्नीच्या हत्येनंतर पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न

प्रातिनिधिक छायाचित्र

नवरा बायकोच्या भांडणात पतीने पत्नीचा खून केला. पत्नीच्या खूनानंतर पतीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सकाळी साडे अकराच्या सुमारास कात्रज कोंढवा रोडवर घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताचा सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पतीला तातडीने ससून रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण 

आरती विनोद चव्हाण (वय-३० रा. साई निवास जवळ, शिवशंभूनगर, कात्रज कोंढवा रोड, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विनोद तानाजी चव्हाण (वय-३८) याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व मयत महिला हे पती पत्नी असून त्यांची वारंवार भांडणे होत होती. त्यांच्या राहत्या घराचा दरवाजा बऱ्याच वेळ बंद असल्यामुळे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांचे दार वाजवले असता ते न उघडल्यामुळे खिडकीच्या दरवाजाची काच फोडून त्यातील एक गज वाकवून एका इसमाने आत मध्ये प्रवेश करून आतून बंद असलेला दरवाजा उघडला. त्यावेळीस मृत महिला व तिचे पती हे दोघेही बाथरूमच्या दरवाज्याजवळ पडलेले आढळले. त्यानंतर आरोपीचे भाऊ निखिल शिंदे यांनी समक्ष कात्रज चौकीत येऊन कळविले.

First Published on: December 14, 2018 6:49 PM
Exit mobile version