Lok Sabha 2024 : मणिपूरमधील या मतदान केंद्रावर गोळीबार; तीन जण गंभीर जखमी

Lok Sabha 2024 : मणिपूरमधील या मतदान केंद्रावर गोळीबार; तीन जण गंभीर जखमी

मणिपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदार आज पार पडत आहे. देशातील 120 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे. मतदानावेळी मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र, तरीही मणिपूरमधील मोइरांग विभागातील थामनपोकपी येथील एका मतदान केंद्रावर मतदानावेळी गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Manipur Loksabha Election Voting 2024 In Manipur Polling Booth Firing Video Viral)

मणिपूरमधील मोइरांग विभागातील थामनपोकपी येथील एका मतदान केंद्रावर झालेल्या गोळीबाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 25 सेकंदांचा हा व्हिडीओ असून यामध्ये गोळीबाराचा आवाज येत आहे. गोळीबार झाल्यामुळे मतदानासाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी गोळीबार होताच मतदान केंद्रावरून पळ काढला. या गोळीबारात तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोइरांग विभागातील थामनपोकपी येथील गोळीबार झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळावरील सुरक्षा व्यवस्था आणखी वाढ करण्यात आली आहे. याबरोबरच मणिपूरच्या इम्फाळ पूर्व येथील एका मतदान केंद्रावर ईव्हीएमची तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघात मतदान

महाराष्ट्रात आज (19 एप्रिल) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी सकाळी 7 वाजता सुरु झालेले मतदान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघात मतदान सुरू आहे.


हेही वाचा – LOK SABHA : नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांची माघार

First Published on: April 19, 2024 4:19 PM
Exit mobile version