मंत्रालयातील काम निकृष्ट, लिफ्टवरची लादी निखळली

मंत्रालयातील काम निकृष्ट, लिफ्टवरची लादी निखळली

Mantralaya lift marble collapse

संपूर्ण राज्याच्या कारभाराचा डोलारा मंत्रालय सांभाळते. पण मंत्रालयाचा हाच डोलारा किती भक्कम आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारी मंत्रालयाच्या तळमजल्यावरील लिफ्टची लादी कोसळून खाली पडली. मंत्रालयासारख्या ठिकाणी बांधकामाची अशी अवस्था असताना सार्वजनिक बांधकामांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मंत्रालयात लिफ्टवरील लादी निखळली. सुदैवाने यामुळे कोणाला हानी पोहोचली नाही.

जबाबदार कोण?

मंत्रालयाच्या तळमजल्यावर लिफ्ट आणि एस्कलेटर आहेत. मात्र सर्रास एस्कलेटरऐवजी मंत्रालयातील अधिकारी , सर्वसामान्य नागरीक लिफ्टचा वापर सर्वाधिक वापर करतात. मात्र आज अचानक १ नंबर लिफ्टच्या दरवाज्यावरील लादी निखळून पडला. सुदैवाने त्यावेळी लिफ्ट जवळ कोणी नव्हत त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही लादी जर कोणाच्या डोक्यात पडली असती तर याला जबाबदार कोण असतं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आगीनंतर मंत्रालयांच्या इमारतीची डागडुजी

आघाडी सरकारच्या काळात म्हणजेच २१ जून २०१२ ला दुपारी मंत्रालयाला आग लागली आणि हा..हा म्हणता मंत्रालयाचे चार मजले आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यानंतर मंत्रालयाच्या इमारतीचा ‘मेकओव्हर’ करण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरकारने घेतला होता. या इमारतीच्या ‘मेकओव्हर’ला आता ६ वर्षे झाली आहेत.

जानकरांच्या कार्यालयातही छत गळती

गेल्यावर्षी पावसाच्या सुरूवातीलाच मंत्रालयातील NX इमारतीमधील सातव्या मजल्यावरचे पावसाने छत कोसळून पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले होते. मंत्रालयातील NX इमारतीच्या ७ व्या मजल्यावर पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेरील बाजूस असलेल्या छताचा काही भाग मुसळधार पावसामुळे कोसळला. त्यामुळे पावसाचे पाणी थेट सातव्या मजल्यावर पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दालनाच्या बाहेरील बाजूस पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे राज्याच्या कारभाराचा डोलारा सांभाळताना मंत्रालयाच्या इमारतीची अशी अवस्था असेल तर उर्वरित कामांचा विचार न केलेला बरा ! असा सूर उमटत आहे.

First Published on: July 2, 2018 5:49 PM
Exit mobile version