मराठा आरक्षण सुनावणी बुधवारीच, पाच दिवस आधीच होणार सुनावणी

मराठा आरक्षण सुनावणी बुधवारीच, पाच दिवस आधीच होणार सुनावणी

मराठा आरक्षण प्रकरणात २५ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी नियोजित तारखेच्या आधीच म्हणजे २० जानेवारीला होणार आहे. या सुनावणी दरम्यान सरकारने चांगली बाजू मांडावी असे आवाहन मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या संघटनांनी केले आहे. सरकारने आरक्षण उठवण्याचा प्रयत्न करावा असे मराठा संघटनांनी मत मांडले आहे. मराठा आरक्षण प्रकरणात पाच दिवस आधीच सुनावणी सुरू होणार आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपिठापुढे ही सुनावणी प्रक्रिया सुरू होईल. उद्यापासून म्हणजे बुधवारपासूनच सर्वोच्च न्यायालयात नियमित अशी सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षण प्रकरणात सरकारने चांगली बाजू मांडावी, अशी मागणी मराठा आंदोलनाचे नेते विनोद पाटील यांनी केली आहे. सरकारने आरक्षण उठवण्याचा प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले. याआधीच मराठा आरक्षण प्रकरणात महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून हालचाली होताना पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पत्र लिहित या प्रकरणात केंद्राने आपली बाजू मांडावी असे आवाहन केले होते. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील खासदारांचे शिष्टमंडळही शरद पवार यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी जाणार होते. या भेटीतही केंद्राने मराठा आरक्षण प्रकरणात बाजू मांडावी असे आवाहन शिष्टमंडळाकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

First Published on: January 19, 2021 10:21 PM
Exit mobile version