मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन – संभाजीराजे

मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन – संभाजीराजे

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वात कोल्हापुरातून मराठा समाजाच्या मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे. यावेळी संभाजीराजे यांनी आजचं आंदोलन मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आहे, असं म्हटलं आहे. दरम्यान, या आंदोलनस्थळी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक, प्रकाश आंबेडकर आणि चंद्रकांत पाटील दाखल झाले आहेत.

आंदोलनस्थळी पोहोचण्या पूर्वी संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन आहे. हा मूक मोर्चा आहे. आज लोकप्रतिनिधी बोलतील, मराठा समाज दु:खी आहे. समाजाला न्याय मिळावा अशी सरकारला विनंती आहे. आमचा लोकप्रतिनिधींवर विश्वास आहे, मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा,” असं संभाजीराजे म्हणाले.

आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना लोकप्रतिनिधींना उलट प्रश्न विचारु नका

आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपणही सन्मानपूर्वक वागणूक द्यायची. कारण ते आपल्यासाठी इथे येणार आहेत. आपल्यापैकी कोणीही त्यांना उलट-सुलट प्रश्न विचारायचे नाहीत. कोणीही बोलायचं नाही. माझ्यासह आपण सर्वांनी मौन राखायचं आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींना बोलू द्यायचं, त्यांचं मन मोकळं करु द्या. हवं तेवढा वेळ बोलू द्यात, असं संभाजीराजे म्हणाले.


हेही वाचा – येत्या अधिवेशनात मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी करणार – चंद्रकांत पाटील


 

First Published on: June 16, 2021 10:59 AM
Exit mobile version