मराठा आरक्षणाला स्थगिती; नाराज कार्यकर्त्यांनी केली जालन्यात बसची तोडफोड

मराठा आरक्षणाला स्थगिती; नाराज कार्यकर्त्यांनी केली जालन्यात बसची तोडफोड

फोटो सौजन्य - झी मीडिया

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे लातूरमध्ये एका उच्च शिक्षीत तरूणाने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलेला असताना दूसरीकडे मराठा आरक्षणाला अंतरीम स्थगिती मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी बसच्या काचा फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबड आगाराच्या बसवर दगडफेक करून बसेसच्या काचा फोडल्या. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरीम स्थगिती दिल्याने नाराज झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाची मागणी करत बसच्या समोरील आणि मागील बाजूच्या काचा फोडल्या असून यामध्ये बसचे नुकसान झाल्याचे दिसतेय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

कार्यकर्त्यांनी टायर जाळून केले आंदोलन

सोलापूर-पुणे महामार्गावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून आंदोलन केलं. मराठा आरक्षण जोवर मिळत नाही तोवर मराठा समाजातील युवक शांत बसणार नसून गनिमी कावा पध्दतीने हे आंदोलन करतच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांना टायर जाळले व सरकारविरोधात घोषणाबाजी करत महामार्ग अडवून ठेवला. अर्धा तास वाहतूक खोळंबल्याने गैरसोय झाली होती. मात्र कोणतीही पोलीस यंत्रणा तेथे पोहोचली नसल्याची माहिती मिळतेय.


‘…कारण मराठा समाज आता एकटा नाही, मी सोबत आहे’

First Published on: September 11, 2020 11:07 PM
Exit mobile version