मराठा आरक्षण : मी भाजपचा ठेका घेतलेला नाही, संभाजीराजेंच्या भाजपला कानपिचक्या

मराठा आरक्षण : मी भाजपचा ठेका घेतलेला नाही, संभाजीराजेंच्या भाजपला कानपिचक्या

मराठा आरक्षणाबाबत भाजपने त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी मी काय त्यांचा ठेका घेतला नाही आहे असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोपांच्या फैरी झडल्या आहेत. मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत. काय चाललंय हे तुम्ही यावर उपाय काय काढणार ते सांगा अशी गर्जना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. संभाजी राजे नाशिक दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. राज्य सरकार आणि केंद्र सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांवर चालढकल करत आहेत. मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला आडवा संभाजी छत्रपती निश्चित येणार असा इशाराच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय देत मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला यानंतर सत्ताधारी विरोधकांवर आरोप करत आहेत. विरोधक सत्ताधारी यांच्यावर आरोप करत आहेत. हे काय चाललंय असा प्रश्न संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षणाचा कायदा रद्द झाला ह्याबद्दल काय घेण-देण नाही आहे. तुम्ही यावर मार्ग काय काढणार हे सांगा? मी समंजस्याची भूमिका घेतल्यामुळे काहीजणांनी टिम-टिम केली त्यांच्यावर संभाजीराजेंनी परखड टीका केली आहे. कोरोनाच्या संकटात माणस जगतील हे महत्त्वाचे आहे असे संभाजी राजेंनी सांगितले आहे.

माझी भूमिका मांडल्यावर तुझ-माझ केलं तर

मराठा आरक्षणासंदर्भातली माझी भूमिका २७ तारखेला मांडणार आहे. मी भूमिका मांडल्यावर आक्रमकपणा काय आहे ते समजेल असे खासदार संभाजीराजे छत्रपतींनी म्हटले आहे. मराठा समाजाचे आंदोलन सध्या करणार नाही. मराठा आरक्षणासदर्भात मला चांगला अनुभव आहे. २००७ पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. २०१४ मध्ये काहीजण आले होते तुमच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षणासाठी लढू असे म्हटले होते ते आता कुठे आहेत? असा सवाल खासदार संभाजीराजेंनी केला आहे. तसेच अजूनही मराठा समाजाबाबत माहिती घेत आहे. राज्यात माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले विद्वान, ज्येष्ठ मंडळी आहेत. त्यांच्या भेटी घेणार आहे. २७ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेत्यांची मुंबईत भेट घेणार आहे.

पंतप्रधानांनी भेटीला वेळ दिला नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींना चार वेळा पत्र लिहिले परंतु त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी मराठा समाजाला काही दिले नाही तर बघून घेऊ असेही खासदार संभाजीराजे छत्रपतींनी म्हटले आहे. भाजपने मराठा आरक्षणावर आपली भूमिका घ्यावी मी काय त्यांचा ठेका घेतला नाही आहे अशा शब्दात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत.

मुबंईत मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाची भूमिका मांडणार आहे. एकदा २७ मे रोजी माझी मराठा आरक्षणाची भूमिका मांडल्यानंतर मराठा नेत्यांनी, आमदार, खासदारांनी जर तुझ- माझं केलं तर बघाच असा सज्जड इशारा खासदार संभाजीराजे छत्रपतींनी दिला आहे. मराठा आरक्षणाची भूमिका मांडल्यानंतर मी आक्रमकपणा काय असतो ते दाखवेलच असेही म्हटले आहे.

प्लेगच्या साथीमध्ये शाहू महाराजांनी लस घेतली

कोरोनाच्या काळात आक्रमक होण्याची वेळ नाही आहे. राज्यात प्लेगची साथ आली होती त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनीही संयम दाखवला होता. त्यावेळी शाहू महाराजांनी स्वतः लस घेतली होती. जनतेच्या मनात भीती होती त्यामुळे शाहू महाराजांनी लस घेतली होती. आक्रमक होयला वेळ लागत नाही. परंतु आता लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. कोणाच्या जिवावर बेतले तर त्याला जबाबदार कोण असा सवालही खसादार संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे.

First Published on: May 20, 2021 12:00 PM
Exit mobile version