सीमा भागासाठी शासकीय मराठी महाविद्यालय सुरू होणार

सीमा भागासाठी शासकीय मराठी महाविद्यालय सुरू होणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्‍या प्रत्येकाची होणार रॅपिड टेस्ट... पालकमंत्री उदय सामंत

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विद्यापीठाचे उपकेंद्र तसेच नवीन शासकीय मराठी महाविद्यालय लवकरच स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली. पुढील शैक्षणिक वर्षांपासून हे महाविद्यालय सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात या शासकीय मराठी महाविद्यालयासाठी पाच एकर जमीन उपलब्ध झाल्यानंतर त्याचा बृहत आराखडा तयार करून महाविद्यालयाला शासन स्तरावरील सर्व मान्यता देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सीमा भागात महाविद्यालय स्थापन करणे तसेच शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासंदर्भात आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना उदय सामंत यांनी सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी सरकारी महाविद्यालयात सुरू करणार असल्याचे सांगितले.

नव्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२१ – २०२२ पासून प्रवेश देण्यात येतील. सीमाभागातील मराठी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांना अधिक दर्जेदार शिक्षण या महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही सामंत म्हणाले.

मराठी महाविद्यालयासाठी समिती

सीमा भागात मराठी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. यात उच्च शिक्षण संचालक, जिल्हाधिकारी कोल्हापूर, पोलीस अधीक्षक कोल्हापूर, डॉ.दीपक पवार, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, यांचा समावेश आहे.

First Published on: June 30, 2020 10:35 PM
Exit mobile version