ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालेकर

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे झालं आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे आज सकाळी निधन झाले. चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी नाथा पुरे आता, राजमाता जिजाऊ, लेक लाडकी, हाय कमांड हे त्यांचे मराठी गाजलेले चित्रपट असून त्यांनी १३ हून अधिकर मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन केले होते. तसेच ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्षही होते.

भालकर यांच्याविषयी थोडक्यात

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओ वाचवण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. नुकताच शालिनी स्टुडिओच्या जागेवर बांधकाम करण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती, त्याचा आनंद दोन दिवसांपूर्वीच त्यांनी साजरा केला होता. रंकाळा तलाव वाचवण्यासाठीही त्यांचे मोलाचे योगदान होते. तर ते नेहमी रोज सकाळी रंकाळा तलावावर नियमित फिरायला येत असत. अलिकडील पाच, सहा वर्षे ते रंकाळा बचाव आंदोलनाचे आघाडीचे कार्यकर्ते बनले होते.

First Published on: December 19, 2018 8:48 AM
Exit mobile version