ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पाचा मराठा क्रांती मोर्चाने केला निषेध

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पाचा मराठा क्रांती मोर्चाने केला निषेध

संधी गमावलेला अर्थसंकल्प

महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. महाविकास आघाडी सरकारच्या या अर्थसंकल्पाचा औरंगाबाद येथे निषेध करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करण्यात आला नाही, असे मराठा क्रांती मोर्चाचे म्हणणे आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला आहे.

या सरकारने शिवस्मारक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास आणि सारथी सारख्या योजनांसाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतुद करण्यात आलेली नाही. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने फसवणूक करत मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.


हेही वाचा – या सरकारला विदर्भ, मराठवाड्याचा विसर – फडणवीस

दरम्यान, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. अर्थसंकल्पाच्या नावाखाली अर्थमंत्री अजित पवारांनी केवळ जाहीर सभेतले भाषण केले. अर्थमंत्र्यांच्या भाषणात आर्थिक स्थितीचे विश्लेषण नव्हते, असे फडणवीस म्हणाले. या सरकारने विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, अशी जहरी टीका फडणवीसांनी केली आहे.

 

First Published on: March 6, 2020 5:45 PM
Exit mobile version