मराठी मजुरांची महाराष्ट्रातच झाली गैरसोय, आली उत्तर प्रदेश सरकारची आठवण!

मराठी मजुरांची महाराष्ट्रातच झाली गैरसोय, आली उत्तर प्रदेश सरकारची आठवण!

लॉकडाऊनमुळे वाराणसीत अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील मराठी मजुरांना आणि पर्यटकांना त्यांच्या मुला बाळाबरोबर उत्तम सुविधा देऊन रेल्वेच्या विश्रांती गृहात ठेवले होते. गुरुवारी त्यांच्या श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाठविण्यांत आले. मात्र महाराष्ट्रात येताच भूमिपुत्रांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. त्यांच्याकडे घरी जायलाही पैसे नव्हते. तब्बल २४ तास मनमाड रेल्वे स्टेशनवर हे उपाशी पोटी नागरीक अडकून पडले होते.  प्रवासाने अंग आगोदरच थकले होते, मुलंही भूकने व्याकूळ झाले होते. मात्र प्रशासनाने यांची कसलीच दखल घेतली नाही. नंतर पायपीट करून आणि रडत निघत असताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना खासगी गाडी करून त्यांना पोटभर जेवण देऊन गावाकडे रवाना केले आहे. मात्र घटनेमुळे महाराष्ट्रातील भूमिपुत्राने महाराष्ट्र शासनाचा कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकार आणि रेल्वेचे आभार मानले आहे.

कोरोनामुळे देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आलेला होता. त्यामुळे वाराणसी मध्ये २१ महाराष्ट्रातील नागरिक आपल्या मुलाबाळा सोबत अडकून पडले होते. त्यात देवदर्शनला गेलेले एकाच कुटुंबातील सात नागरिक होते. तर टेलिफोन कँबेलचा कामासाठी गेलेलं १४ मराठी श्रमिक मजुरांचा समावेश होता. राज्याच्या सीमा बंद झाल्याने व जवळचे पैसे संपल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले होते. अभिमान गायकवाड यांनी दैनिक आपलं महागरशी बोलताना सांगितले कि,  आम्ही जालना जिल्हातील मंठा तालुक्यातून १४ जण वाराणसीला टेलिफोन कँबेलचा कामाला गेलो होतो. मात्र तिथे जाताच लॉकडाऊन लागू झाला. त्यामुळे जवळचे संपूर्ण पैसे संपले होते. त्यामुळे आम्ही तिथे अडकून पडलो होतो. नंतर आम्ही वाराणसी रेल्वे स्थानकांवर आश्रय घेतला, रेल्वेने सुद्धा आम्हाला विश्रांती गृहात ठेवले. तसेच आमच्या बरोबर देव दर्शनाला आलेला एक कुटूंबीय सुद्धा होते, त्यांच्याकडे लहान मुले आणि वयोवृद्ध सासरे होते. असे आम्ही २१ जण रेल्वेच्या विश्रांतीगृहात थांबलो. गेल्या दोन महिन्यात रेल्वेनी कपड्यापासून तर जेवणापर्यत सर्वच सुविधा आम्हाला दिली. इतकेच नव्हे तर वेळोवेळी आरोग्याची तपासणी सुद्धा आमची केली. आमच्या लहान मुलांच्या करमणुकीसाठी टीव्ही सुविधा सुद्धा दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तब्बल दोन महिन्यानंतर श्रमिक ट्रेनचा माध्यमातून आम्हाला मनमाड रेल्वे स्थानकांवर पर्यंत सोडून देण्यात आले.

रेल्वेचे मानले आभार

महाराष्ट्र शासनाकडून मदत मिळेल असे रेल्वे प्रवाशांसाने सांगितल्यानंतर हे बुधवारी रात्री १० वाजता मनमाड रेल्वे स्थानकांवर पोहचलो. मात्र तिथे कोणीच मदतीला नव्हेत. रेल्वे प्रशासनाने स्थानिक प्रशासनाला यांची माहिती दिली. त्यानंतर बुधवारी दिवसभर आम्ही २१ जण बसून होतो. रात्र झाली कसली मदत होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर पायी जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासाने अंग आगोदरच थकले होते,  मुलंही भूकेने व्याकूळ झाली होती. नंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतल्यानंतर आम्हाला दोन खासगी वाहनात बसून दिले. जेवणाची सुद्धा सोय केली. त्यामुळे आम्ही रेल्वेचे आभार मानतो. अशा प्रतिक्रिया योगिता आळकीने यांनी दैनिक आपलं महानगरला दिली आहे .

मनमाड रेल्वे स्थानकांवर हे प्रवासी उतरले होते. त्यानंतर आम्हाला कळले कि यांना जालना जिल्हात जायचं आहेत. त्यानंतर आम्ही स्थानिक प्रशासनाबरोबर संपर्क केला होता. मात्र कसली सुविधा तिथे उपलब्ध नव्हती. त्यानंतर आम्ही यांना खासगी वाहनाच्या माध्यमातून त्यांच्या जिल्हा पाठविले.

– राजेंद्र शर्मा, वरिष्ठ वाणिज्य अधिकारी, भुसावळ विभाग, मध्य रेल्वे

परराज्यातून महाराष्ट्र मध्ये येणाऱ्या नागरिकांची माहिती राज्य सरकारला दिली जाते. गेल्या दोन महिन्यानंतर आता मोठ्या प्रमाणात स्वतःचा राज्यात परतणाऱ्या मराठी श्रमिक मजूर आणि पर्यटकांकडे  सरकार आणि प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष  होत आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र सरकारच्या नियोजनात अभाव दिसून येत आहे. महाराष्ट्र सरकारने यांची खबरदारी घ्यावी आणि आपली चूक दुरुस्त करावी.

देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य, भाजप


हे ही वाचा – भूमाफियांनी महिलेला शेतात जिवंत जाळले, घटना कॅमेरात कैद!


 

First Published on: June 5, 2020 6:16 PM
Exit mobile version