मिनी ट्रेन येणार नव्या रुपात

मिनी ट्रेन येणार नव्या रुपात

माथेरानची मिनी ट्रेन

मध्य रेल्वेने माथेरानला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर दिली आहे. माथेरान मिनी ट्रेनचे प्रवासी डब्बे आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेने केला आहे. माथेरानच्या मिनी ट्रेनच्या २ डब्ब्यांवर आकर्षक निसर्गाचं चित्र काढण्यात आलं आहे. शिवाय, डब्ब्यांवर पशू-पक्ष्यांसह माथेरान घाटाचं चित्रं देखील रेखाटण्यात आलं आहे. याशिवाय सहा डब्यांपैकी एक डबा वातानुकूलित असणार आहे. लवकरच ही नव्या रुपातील मिनी ट्रेन पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

ऑक्टोबरमध्ये सुरू होईल सेवा 

नवीन लूक असलेले २ डब्बे पाऊस पूर्णपणे गेल्यानंतर पर्यटकांच्या सेवेत दाखल होतील. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच ही सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या कुर्डूवाडी कार्यशाळेत येथे हे दोन्ही डब्बे तयार करण्यात आले आहेत. एकूण ५ डब्बे माथेरानच्या मिनी ट्रेनचे असतात. त्यामुळे आणखी ३ डब्बे तयार होणार आहेत. त्यानुसार, ५ ही डब्ब्यांची मिनी ट्रेन ऑक्टोबरमध्ये पर्यटकांच्या सेवेत दाखल होईल.

तसेच आणखी दोन नवीन इंजिनंदेखील तयार केली जात आहेत. उच्च श्रेणीच्या पर्यटकांना वातानुकूलित प्रवासाचीही सोय उपलब्ध केली जाणार असल्याची माहितीही मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

First Published on: August 31, 2018 7:18 PM
Exit mobile version