मियावकी पध्दतीने शहरी वनीकरणाच्या कामाला सुरुवात

मियावकी पध्दतीने शहरी वनीकरणाच्या कामाला सुरुवात

महापालिका रुग्णालयांमध्ये समन्वयका अभावी खाटांचा घोळ; दूरध्वनीवरुन खाटेचा शोध

मुंबईत ६४ ठिकाणी मियावाकी पध्दतीने शहरी वनीकरण करण्याची कामे हाती घेवून त्यासाठी ३५ कोटी ४३ लाख रुपयांचे कंत्राट दिल्यानंतर आता याकामासाठी सल्लागाराची नेमणूक केली आहे. आधी कंत्राट बहाल केले आणि त्यानंतर महापालिका प्रशासनाने सल्लागाराची नेमणूक केल्यामुळे महापालिकेचा कारभार आता उलट्या दिशेने चालत असल्याचे स्षष्ट झाले आहे. कंत्राट कामांचा प्रस्ताव मंजूर करताना, सल्लागारांची नेमणूक कधी करणार असा सवाल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला होता. त्यामुळे सल्लागार नेमणुकीपूर्वी या कंत्राट कामाच्या प्रस्तावाला समितीने मंजुरी दिली होती.

मुंबईत मियावकी पध्दतीने वनीकरण करण्याच्या प्रकल्पासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने वृक्ष प्राधिकरणापुढे मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. यामध्ये शहर व पश्चिम उपनगरासाठी मेसर्स अ‍ॅकॅशिया इको प्लॅन्टेशन आणि पूर्व उपनगरासाठी केसरी इन्फ्राबिल्ड प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांची निवड करण्यात आली. या दोन्ही कंपन्यांना प्रति १०० चौरस मीटरकरता २१ हजार ५०० रुपयांचा दर सल्लागार शुल्क म्हणून देण्यात येणार आहे. या दोन्ही कंपन्यांना अनुक्रमे अंदाजित ५० हजार २०० चौरस मीटर आणि ७४ हजार ४२ चौरस मीटर क्षेत्रफळावर हे वनीकरण केले जाणार असून जेवढे वनीकरण केले जाणार आहे, त्याचे शुल्क सल्लागार सेवा म्हणून दिले जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांना अनुक्रमे १ कोटी ०७ लाख ९३ हजार रुपये व १ कोटी ५९ लाख १९ हजार रुपयांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.

याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपचे हरिष भांदीर्गे यांनी उपसूचनेद्वारे स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यावे,अशी सूचना केली तर भाजपचे अभिजित सामंत यांनी ६४ ठिकाणांची यादी सादर करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत कप्तान मलिकसह अन्य नगरसेवकांनी भाग घेतला होता.

First Published on: March 14, 2020 3:45 PM
Exit mobile version